Ananya Panday summoned by NCB अनन्या पांडेची २५ ऑक्टोबरला एनसीबी पुन्हा चौकशी करणार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 22, 2021 | 20:12 IST

ड्रग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची २५ ऑक्टोबरला एनसीबी पुन्हा चौकशी करणार आहे

Ananya Panday summoned by NCB again on Monday 25 October 2021
Ananya Panday summoned by NCB अनन्या पांडेची २५ ऑक्टोबरला एनसीबी पुन्हा चौकशी करणार 
थोडं पण कामाचं
  • अनन्या पांडेची २५ ऑक्टोबरला एनसीबी पुन्हा चौकशी करणार
  • अनन्याची काल (गुरुवार २१ ऑक्टोबर २०२१) आणि आज (शुक्रवार २२ ऑक्टोबर २०२१) अशी सलग दोन दिवस चौकशी झाली
  • गुरुवारी सुमारे दोन तास आणि शुक्रवारी सुमारे चार तास अनन्याची चौकशी झाली

मुंबईः ड्रग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची २५ ऑक्टोबरला एनसीबी पुन्हा चौकशी करणार आहे. याआधी अनन्याची काल (गुरुवार २१ ऑक्टोबर २०२१) आणि आज (शुक्रवार २२ ऑक्टोबर २०२१) अशी सलग दोन दिवस चौकशी करण्यात आली. आता दोन दिवसांनंतर थेट सोमवार २५ ऑक्टोबर रोजी एनसीबी अनन्याची चौकशी करणार आहे. Ananya Panday summoned by NCB again on Monday 25 October 2021

अनन्याला पुढील चौकशीसाठी सोमवारी सकाळी बोलावले असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई ऑफिसचे अधिकारी अशोक मुथा जैन यांनी दिली. आर्यन आणि अनन्या यांच्यातील चॅटमध्ये संशयास्पद उल्लेख आढळल्यामुळे एनसीबीने अनन्याची चौकशी केली. एनसीबीच्या मुंबई ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सुमारे दोन तास आणि शुक्रवारी सुमारे चार तास अनन्याची चौकशी केली. 

एनसीबीकडून एक महिला अधिकारी, तपास अधिकारी व्ही. व्ही. सिंह आणि एनसीबीच्या मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे यांनी अनन्याला सलग दोन दिवस अनेक प्रश्न विचारल्याचे समजते. सलग दोन दिवस अनन्यासोबत चंकी पांडे एनसीबी ऑफिसमध्ये येत आहे. अनन्याची चौकशी सुरू असताना चंकी पांडेला एनसीबीच्या ऑफिसमध्ये एके ठिकाणी शांतपणे बसून राहण्यास परवानगी मिळाली असल्याचे समजते.

अन्य एका ड्रग प्रकरणात बॉलिवूड अभिनेता अरमान कोहली याला न्यायालयीन कोठडी झाली आहे. अरमानच्या प्रकरणात त्याचा मित्र बाबुभाई काचवाला याचीही आज (शुक्रवार २२ ऑक्टोबर २०२१) एनसीबीने चौकशी केली. बाबुभाईने चंकी पांडेला समीर वानखेडे यांच्या केबिनबाहेर बसून राहिल्याचे बघितले. 

अनन्या आरोपी की साक्षीदार अद्याप निर्णय नाही

अनन्याची चौकशी सुरू आहे. ड्रग प्रकरणात अनन्याला आरोपी म्हणून न्यायालयात सादर करणार की तिला साक्षीदार करणार हे एनसीबीने अद्याप जाहीर केलेले नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी