Andheri East Bypoll Result : आज लागणार अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल, नोटाला किती मते मिळणार याकडे लक्ष 

Andheri East Bypoll Result : बहूचर्चित अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. अंधेरीसोबत देशातील सात राज्यांत सहा ठिकाणी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतगणना सुरू झाली आहे.

rutuja latake
ऋतुजा लटके  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बहूचर्चित अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे.
  • अंधेरीसोबत देशातील सात राज्यांत सहा ठिकाणी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे.
  • सकाळी ८ वाजल्यापासून मतगणना सुरू झाली आहे.

Andheri East Bypoll Result : मुंबई : बहूचर्चित अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. अंधेरीसोबत देशातील सात राज्यांत सहा ठिकाणी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतगणना सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर हा निकाल जाहीर होणार आहे. (Andheri East Bypoll Result announcement today shivasena uddhav balasaheb thackeray rutuja latake may won this seat )

अधिक वाचा :  दुर्दैवी !, पीक कापणीचे काम उरकून परतणाऱ्या मजूरांच्या गाडीचा भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात २०१९ साली शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा विजय झाला होता. परंतु त्यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. शिवसेनेकडून लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. ही पोटनिवडणूक राज्याच्या राजकारणासाठी एक वगळीच निवडणूक ठरली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर जाहीर झालेल्या या अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाचा पक्ष चिन्हावरून तसेच नावावरून वाद झाला. तेव्हा निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. तसेच शिवसेना हे नाव दोन्ही गटांना वापरण्यास बंदी घातली. तेव्हा उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह तर शिंदे गटाला ढाल आणि तलावर हे नाव मिळाले. ठाकरे गटाच्या पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर शिंदे गटाच्या पक्षाचे नाव बाळासाहेबांची शिवसेना हे ठरवण्यात आले. 

अधिक वाचा : Amruta Fadanvis : भिडे गुरूजी हिंदुत्वाचा स्तंभ त्यांनी महिलांचा आदर करावा - अमृता फडणवीस

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाने आपला उमेदवार जाहीर केला नाही, परंतु त्यांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला. भाजपने मूरजी पटेल यांना आधी उमेदवारी जाहीर केली, परंतु नंतर त्यांना उमेदवारी मागे घेण्याचे आदेश दिले. आता अंधेरीची पोटनिवडणूक ऋतुजा लटके जिंकतील असे सांगितले जाते परंतु या निवडणुकीत नोटाला किती मते मिळतील याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

अधिक वाचा : Bharat Jodo Yatra : ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं; ऐका घटनाक्रम दस्तुरखुद्द नितीन राऊतांकडून…

अंधेरीसोबतच उत्तर प्रदेशच्या गोला गोकर्णनाथ, बिहारमधील गोपालगंज आणि मोकापा, हरयाणातील आमदपूर, ओडिशातील धामनगर या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. तेलंगाणा, हरयाणा या विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पोटनिवडणूक होत आहे. तर बिहारच्या मोकापा विधानसभा मतदारसंघात राजदचे आमदार अनंत सिंह यांची आमदारकी रद्द झाल्यानंतर पोटनिवडणूक होणार आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी