Andheri East Bypoll : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पहिला विजय

Rutuja Latake Won : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत लटके यांना 55 हजार 946  मते मिळाली आहेत. आतापर्यंत मतमोजणीच्या 15 फेरी झाल्या असून अद्याप 4 फेरी बाकीत आहेत. आता फक्त लटके यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे.  लटके यांच्यानंतर सर्वाधिक मते नोटाला मिळाली आहेत.

rutuja latake won
अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे.
  • आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत लटके यांना 55 हजार 946  मते मिळाली आहेत.
  • आता फक्त लटके यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे.  

Rutuja Latake Won :मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत लटके यांना 55 हजार 946  मते मिळाली आहेत. आतापर्यंत मतमोजणीच्या 15 फेरी झाल्या असून अद्याप 4 फेरी बाकीत आहेत. आता फक्त लटके यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे.  लटके यांच्यानंतर सर्वाधिक मते नोटाला मिळाली आहेत. नोटाला तब्बल 10 हजार 906 मते मिळाली आहेत. भाजपच्या मूरजी पटेल यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला होता.  (andheri east bypoll rutuja latake candidate of shivsena uddhav balasaheb thackeray party won)

अधिक वाचा : Nawab Malik: नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ, लवकरच ईडी मालमत्तेवर आणणार टाच

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पहिला विजय

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले होते. तसेच शिवसेना हे नाव वापरण्यासही बंदी घातली होती. तेव्हा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळाले. तर शिंदे गटाला ढाल आणि तलवार हे निवडणूक चिन्ह आणि बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले होते. या निवडणुकीत शिंदे गटाने आपला उमेदवार जाहीर केला नव्हता. भाजपने मूरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती, तर शिंदे गटाने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. नंतर भाजपने अपाला उमेदवार मागे घेतला आणि लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक शिवसेनेसाठी महत्त्वाची होती. आगामी काळात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक पालिकेची लिटमस टेस्ट आहे असे मानले जात होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हा पहिलाच विजय आहे. 

अधिक वाचा :   Eknath Shinde : राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवा, आदित्य ठाकरे यांचे शिंदे गटाला आव्हान 

नोटाला हजारो मते

अंधेरी पोटनिवडणुकीच्या आतापर्यंत 15 फेरी पूर्ण झाल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लटके यांना 55 हजार 946 मते मिळाली आहेत. लटके यांच्याविरोधात सहा उमेदवार रिंगणात होते. परंतु लटके यांच्यानंतर नोटाला सर्वाधिक मते मिळाली आहेत. नोटाला आतापर्यंत 10 हजार 906 मते मिळाली आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी