anil deshmukh boss no. 1 अनिल देशमुख बॉस नंबर वन

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 02, 2021 | 23:57 IST

anil deshmukh boss no. 1 । वाझेच्या म्हणण्यानुसार अनिल देशमुख हेच त्याचे बॉस नंबर वन; अशी माहिती ईडीने मुंबईच्या विशेष पीएमएलए कोर्टात दिली.

anil deshmukh boss no. 1
अनिल देशमुख बॉस नंबर वन 
थोडं पण कामाचं
  • अनिल देशमुख बॉस नंबर वन
  • अनिल देशमुख यांच्यावर आरोप ठेवण्यासाठी ईडीने तयार केलेल्या रिमांड कॉपीमधील महत्त्वाचे मुद्दे
  • १०० कोटींच्या अफरातफरीचा तपास सुरू आहे.

anil deshmukh boss no. 1 । मुंबईः महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस दलात त्यावेळी कार्यरत असलेल्या सचिन वाझे याला खंडणी वसुलीचे काम सोपवले होते. वाझेने डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ४ कोटी ७० लाख रुपये जमा करुन दिले होते. वाझेच्या म्हणण्यानुसार अनिल देशमुख हेच त्याचे बॉस नंबर वन; अशी माहिती ईडीने मुंबईच्या विशेष पीएमएलए कोर्टात दिली. कोर्टाने त्यांच्यासमोर सादर झालेल्या माहितीची दखल घेऊन अनिल देशमुख यांना शनिवार ६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ईडी कोठडी दिली. 

ईडीच्या कोठडीत असताना अनिल देशमुख यांना घरचे अन्न आणि औषधे मिळतील तसेच ईडीचे अधिकारी देशमुखांची चौकशी करत असताना त्यांचे वकील ईडी उपस्थित राहू शकतील. यासाठी अनिल देशमुख यांनी केलेला विनंती अर्ज कोर्टाने मंजूर केला.

अनिल देशमुख यांच्यावर आरोप ठेवण्यासाठी ईडीने तयार केलेल्या रिमांड कॉपीमधील महत्त्वाचे मुद्दे - 

  1. अनिल देशमुख यांनी त्यांच्या ओळखीतल्या व्यक्तींच्या माध्यमातून शेल कंपन्या ऑपरेट करायला सुरुवात केली. या कंपन्यांच्या माध्यमातून पैसे फिरवले. ईडीच्या आतापर्यंतच्या तपासात देशमुख कुटुंबियांशी संबंधित अशा २७ शेल कंपन्या आढळल्या. याच प्रकरणात वारंवार चौकशीसाठी समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीसमोर आले नव्हते.
  2. दिल्लीतल्या शेल कंपनीच्या माध्यमातून अनिल देशमुख यांनी त्यांच्या नागपूरमधील साई शिक्षण संस्थेत पैसे डोनेशनच्या नावाखाली फिरवले. आतापर्यंत जो तपास करण्यात आला, जी कागदपत्रे आढळली; त्यानुसार देशमुख दोषी आहेत.
  3. अनिल देशमुख ज्या दिवशी चौकशीसाठी हजर झाले त्यादिवशी ईडीच्या चौकशीला सहकार्य करत नव्हते. 
  4. १०० कोटींच्या अफरातफरीचा तपास सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी