१५ नोव्हेंबरपर्यंत देशमुखांना ईडी कोठडी तर वाझेला पोलीस कोठडी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 14, 2021 | 02:52 IST

Anil Deshmukh in ED Custody till 15 November and Sachin Waze in Police Custody till 15 November महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना १५ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी, सचिन वाझे याला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Anil Deshmukh in ED Custody till 15 November and Sachin Waze in Police Custody till 15 November
१५ नोव्हेंबरपर्यंत देशमुखांना ईडी कोठडी तर वाझेला पोलीस कोठडी 
थोडं पण कामाचं
  • १५ नोव्हेंबरपर्यंत देशमुखांना ईडी कोठडी तर वाझेला पोलीस कोठडी
  • खंडणी वसुली आणि पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी देशमुखांना ईडी कोठडी
  • खंडणी वसुली प्रकरणात वाझेला पोलीस कोठडी

Anil Deshmukh in ED Custody till 15 November and Sachin Waze in Police Custody till 15 November । मुंबईः खंडणी वसुली आणि पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना १५ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे. तसेच खंडणी वसुली प्रकरणात मुंबई पोलीस दलातून काढून टाकण्यात आलेल्या सचिन वाझे याला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस कोठडीत असताना वाझे मुंबई पोलीस दलाच्या क्राईम ब्रँचच्या कोठडीत असेल.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे या दोघांनी अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. मुंबईतून १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्यासाठी वाझेला जबाबदारी दिली होती, असा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. नंतर वाझेनेही खंडणी वसुलीसाठी टार्गेट देण्यात आल्याची कबुली दिली होती. या कबुली नंतर खंडणी वसुली प्रकरणात अनिल देशमुख आणि सचिन वाझे या दोघांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मुंबईतील विशेष न्यायालयाने देशमुखांची ईडी कोठडी १५ नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय दिला. तर मुंबईच्याच एस्प्लेनेड कोर्टाने सचिन वाझेला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा निर्णय दिला. ईडी देशमुखांची चौकशी पूर्ण करुन त्यांचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया पार पाडत असल्याचे वृत्त आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी