Anil Deshmukh In KEM ICU : मुंबई : न्यायालयीन कोठडीत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना मुंबईच्या केईएम हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. छातीत वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर अनिल देशमुख यांना केईएम हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.
अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई
अनिल देशमुख यांच्यावर आर्थिक अफरातफर आणि खंडणी वसुली प्रकरणात आरोप होत आहेत. आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात ईडी आणि सीबीआय अनिल देशमुख यांची चौकशी करत आहेत. सध्या अनिल देशमुख मुंबईत न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड जेलमध्ये आहेत. जेलमध्ये असतानाच अनिल देशमुख यांनी अस्वस्थ वाटत असल्याची आणि छातीत वेदना होत असल्याची तक्रार केली. यानंतर अनिल देशमुख यांना केईएम हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. वैद्यकीय पथक अनिल देशमुख यांच्यावर उपचार करत आहे.
अनिल देशमुख यांच्या विरोधात माफीचा साक्षीदार होण्यासाठी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अर्ज केला आहे. या अर्जावर सीबीआयच्या विशेष न्यायालयात ३० मे रोजी सुनावणी होणार आहे. ही सुनावणी होण्याआधीच अनिल देशमुख यांनी छातीत वेदना होत असल्याची तक्रार केली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनीच सचिन वाझे याला १०० कोटी खंडणी वसुलीचे टार्गेट दिले होते; असे परमबीर सिंह म्हणाले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.