Anil Deshmukh Judicial Custody : अनिल देशमुखांना आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 20, 2022 | 18:19 IST

Anil Deshmukh Judicial Custody Extended for another 14 days : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी चौदा दिवसांची वाढ करण्यात आली.

Anil Deshmukh Judicial Custody Extended for another 14 days
अनिल देशमुखांना आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 
थोडं पण कामाचं
  • अनिल देशमुखांना आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
  • मनी लाँड्रिंग अर्थात आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात अनिल देशमुख अटकेत आहेत
  • विशेष पीएमएलए कोर्टाने अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली

Anil Deshmukh Judicial Custody Extended for another 14 days : मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी चौदा दिवसांची वाढ करण्यात आली. १०० कोटींच्या मनी लाँड्रिंग अर्थात आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात अनिल देशमुख अटकेत आहेत. विशेष पीएमएलए कोर्टाने अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. यामुळे अनिल देशमुखांचा मुंबईच्या आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. 

इडीने अनिल देशमुखांना १०० कोटींच्या मनी लाँड्रिंग अर्थात आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात अटक केली आहे. अनिल देशमुखांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली. या कारवाईला ६० दिवस होऊन गेल्यामुळे नैसर्गिक हक्कानुसार जामीन मिळावा असा अर्ज अनिल देशमुख यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने कोर्टात केला होता. पण इडीचा युक्तीवाद ऐकल्यानंतर विशेष पीएमएलए कोर्टाने आधी अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला आणि आता त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. 

इडीने अनिल देशमुखांविरोधात २९ डिसेंबर २०२१ रोजी सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात अनिल देशमुख यांना इडीने मुख्य आरोपी केले आहे. याआधी मुंबईतील १७५० बार, रेस्टॉरंट, हॉटेल आदी आस्थापनांकडून नियमित खंडणी वसुली करुन दरमहा १०० कोटी रूपये जमा करून द्यायचे अशा स्वरुपाचा तोंडी आदेश देशमुखांनी एपीआय सचिन वाझे याला दिल्याचा आरोप करणारे पत्र मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबिरसिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले. या पत्राची दखल घेऊन मुंबईच्या उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. सीबीआयच्या चौकशीत मनी लाँड्रिंग झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. यानंतर इडीने गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आणि आरोपपत्रही दाखल केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी