अनिल देशमुखांची Default Bail साठी न्यायालयात धाव; CBI चा जोरदार विरोध, आज पुन्हा सुनावणी

मुंबई
भरत जाधव
Updated Jun 14, 2022 | 09:56 IST

शंभर कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांमुळे न्यायालयीन कोठडीत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री (Former Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) सुटकेसाठी अनेक प्रयत्न करत आहेत. अनिल देशमुखांनी डिफॉल्ट (Default) जामीन मिळावा, यासाठी विशेष सीबीआय न्यायालयात धाव घेतली आहे. अनिल देशमुखांच्या जामीन अर्जाला सीबीआयकडून मात्र जोरदार विरोध करण्यात आला आहे.

Anil Deshmukh runs in court for default bail
अनिल देशमुखांची Default Bail साठी न्यायालयात धाव  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आरोपपत्र पूर्ण असल्याचा दावाही सीबीआयनं केला आहे.
  • अनिल देशमुखांसह संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांच्या विरोधात सीबीआयनं 59 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे.

Anil Deshmukh : मुंबई :  शंभर कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांमुळे न्यायालयीन कोठडीत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री (Former Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) सुटकेसाठी अनेक प्रयत्न करत आहेत. अनिल देशमुखांनी डिफॉल्ट (Default) जामीन मिळावा, यासाठी विशेष सीबीआय न्यायालयात धाव घेतली आहे. अनिल देशमुखांच्या जामीन अर्जाला सीबीआयकडून मात्र जोरदार विरोध करण्यात आला आहे.

यावेळी तपास यंत्रणेचं आरोपपत्र अपूर्ण असल्याचा दावा अयोग्य असल्याची माहिती सीबीआयानं दिली. याप्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. अनिल देशमुखांच्या डिफॉल्ट जामीन अर्जाला विरोध करतानाच सीबीआयनं या प्रकरणात दाखल करण्यात आलेलं आरोपपत्र पूर्ण असल्याचा दावाही सीबीआयनं केला आहे. अनिल देशमुखांसह संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांच्या विरोधात सीबीआयनं 59 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. मुंबई पोलीस दलातील बरखास्त पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) हा या प्रकरणातील माफीचा साक्षीदार बनला आहे. 

सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

अनिल देशमुखांविरोधात सीबीआयनं आपलं पहिलं आरोपपत्र सादर केलं आहे. दरमहा 100 कोटींच्या कथित खंडणी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांनुसार, सीबीआयनं पहिला गुन्हा नोंदवत तपास सुरू केला होता. पुढे ईडीनं याच एफआयआरमध्ये अनिल देशमुखांसह इतरांना अटक केली. त्यानंतर हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना एप्रिल 2022 मध्ये सीबीआयनं अनिल देशमुखांसह संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझेला आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतलं. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात संक्षिप्त आरोपपत्र दाखल केलं. 

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. तसेच बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि इतरांना बार आणि रेस्टॉरंटमधून महिन्याला 100 कोटी वसूल करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोपही केला आहे. या प्रकरणी नोव्हेंबर 2021 मध्ये 72 वर्षीय देशमुखांना ईडीनं अटक केली. तेव्हापासून देखमुख आर्थर रोड कैदेतच आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी