मुंबई : 100 कोटींच्या खंडणी प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलेल्या जामिनावर स्थगिती वाढवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आज आर्थर रोड तुरुंगातून दुपारी ५ वाजता बाहेर आले. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्यावतीने जंगी स्वागत करण्यात तयारी केली होती. दिग्गज नेते त्यांच्या स्वागतासाठी जेलबाहेर उपस्थित होते. देशमुख तरुंगाबाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेतले. (Anil Deshmukh's release from jail, preparing for a militant welcome from the Nationalists)
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 12 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. सीबीआयने पुढील कारवाईसाठी त्याला सोडण्यासाठी आणखी 10 दिवसांचा अवधी घेतला होता. यानंतर सीबीआयने या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दुसरे अपील केले, ते मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले.
अनिल देशमुख यांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि नागपूर या दोन्ही शहरात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी करण्यात आली. सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास देशमुख तुरुंगाबाहेर येणार असल्याने १२ वाजल्यापासून कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली आहे. तुरुंगाबाहेर पाच वाजण्याच्या सुमारास राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. देशमुख तुरुंगाबाहेर येताच एकच जल्लोष करण्यात आले. त्यांचे हार घालून स्वागत करण्यात आले त्यानंतर कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतले. सायंकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आर्थर रोड तुरुंग ते सिद्धीविनायक मंदिर अशी बाईक रॅली काढण्यात आली.
महाविकास आघाडी सरकारमध्ये खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. देशमुख यांनी गृहमंत्री असताना एपीआय सचिन वाझे यांना मुंबईतील बारमधून दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्याचे आदेश दिल्याचा आरोप आहे. त्याचवेळी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राने खळबळ उडवून दिल्याने ठाकरे सरकारला मोठ्या धक्का बदला होता.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.