Anil Parab : ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचं मुंबईतील वांद्रे परिसरात कार्यालय होते. वांद्रे येथील गांधीनगर परिसरात असलेले कार्यालय अनधिकृत असल्याची तक्रार म्हाडाला मिळाली होती. या तक्रारीनुसार कार्यालयाचे पाडकाम 31 जानेवारी रोजी होणार होते. मात्र, म्हाडाकडून कारवाई होण्यापूर्वी अनिल परबांनीच हे बांधकाम पाडले. यानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनाही आव्हान दिले आहे.
अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं, कालपासून एक बातमी वृत्तवाहिन्यांवर सुरू आहे की अनिल परबांचं अनधिकृत बांधकाम तोडलेलं आहे. याबाबतची वस्तूस्थिती मी आता सांगत आहे. 1960 सालापासून म्हाडाच्या या इमारती तयार झाल्या. या इमारतीतच माझा जन्म झाला. आपण ज्या इमारतीच्या समोर आहोत त्या इमारतीचा मी रहिवासी आहे. या इमारतीत माझं लहानपण गेलं, इथेच मी लहानाचा मोठा झालो. या इमारती रहिवाशांच्या स्वत:च्या मालकीच्या आहेत, म्हाडाच्या मालकीच्या राहिलेल्या नाहीयेत. मी आमदार झाल्यावर इथल्या रहिवाशांनी मला सांगितलं की, आपण आमदार झालात. आपलं जनसंपर्क कार्यालय हे आपल्या इमारतीतच राहू दे. सोसायटीची जागा तुम्ही वापरा आणि ती वापरायला मला काही हरकत नाही. त्यामुळे सोसायटीची जागा मी वापरत होतो.
हे पण वाचा : जेवणात चुकून तिखट जास्त झाले तर काय करायचं?
गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा मी वापरत होतो. मातर्, काही जणांनी या संदर्भात तक्रारी केल्या. मी ज्यावेळी मंत्री झालो त्यावेळी किरीट सोमय्या यांनी म्हाडा, लोकायुक्त या सर्वांकडे जाऊन अनिल परबांचं कार्यालय अनधिकृत बांधकाम असल्याचं भासवून ते तोडण्याची मागणी केली. त्या अनुषंगाने म्हाडाने मला नोटीस दिली. म्हाडाने जेव्हा मला नोटीस दिली तेव्हा मी त्या नोटीसला उत्तर दिलं की, सदर जागा माझी नाही आणि या जागेशी माझा संबंध नाही. ही जागा सोसायटीची आहे. त्यानंतर म्हाडाने नोटीस मागे घेतली. रहिवासी कोर्टात गेले तेव्हा रेग्युलायझेशनचा अर्ज केला. म्हाडानं मला पत्र दिलं की रेग्युलाईज करण्यात येऊ नये असंही अनिल परब म्हणाले.
हे पण वाचा : अशा मुलांवर मुली सहज होतात घायाळ
अनिल परब यांनी म्हटलं, रहिवासी कोर्टात गेले तेव्हा रेग्युलायझेशनचा अर्ज केला. हायकोर्टानेसांगितलं की, तुम्ही रेग्युलाईज करण्यासाठी अर्ज करा. त्यानुसार रहिवाशांनी अर्ज केला. मात्र, काही दिवसांपूर्वी म्हाडाने सांगितलं की, रेग्युलाईज करता येणार नाही. किरीट सोमय्या यांनी वारंवार म्हाडावर दबाव टाकला की, हे रेग्युलाईज करु नका. त्यानंतर म्हाडाने रहिवाशांना पत्र दिलं की, रेग्युलाईज करता येणार नाही. त्यानंतर रहिवाशांनी बैठक घेऊन हे कार्यालय स्वत: रिकामी करण्याचा निर्णय घेतला.
हे पण वाचा : केशर पाणी पुरुषांना देतो खास बूस्टर, वाचा फायदे
इथे गरीबांचा घरं आहे, म्हाडाच्या 56 वसाहती आहेत. या इमारती आता पुनर्विकासाच्या मार्गावर आहेत. अशा पुनर्विकासाच्या मार्गावर अशा प्रकारची ऑर्डर येणं आणि लोकांना मुळ घरे होती जी 220 स्क्वेअर फुटची जागा आहे तेवढीच जागा द्यायची. जास्त कोणी मागू नये म्हणून मला वाटतं की, सोमय्यांनी बिल्डरांची सुपारी घेऊन माझ्यावर निशाणा साधला आहे असंही परब म्हणाले.
हे पण वाचा : तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी खास घरगुती उपाय
भाजपने सोमय्यांच्या माध्यमातून साधलेला हा डाव आहे का? सोमय्यांना माझं आव्हान आहे की, नारायण राणे यांचं घर तोडण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. सोमय्या तिथे माझ्यासोबत पहायला येणार आहेत का? मी तर पाहण्यासाठी जाणार आहे. सोमय्या कोण आहे? तो म्हाडाचा अधिकारी आहे का, तो मनपाचा अधिकारी आहे का? मी म्हाडाला पत्र लिहिलं आहे, की या लोकांनी आप-आपली जागा तोडून पूर्ववत केली आहे. आपण अधिकारी पाठवून तपासणी करा आणि आपला रिपोर्ट तयार करा. माझ्यासोबत सर्व 56 वसाहतीतील लोकं आहे, गरीबांच्या पोटावर जर किरीट सोमय्या येणार असेल तर मी समोर जाईल.- मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर देखील हा विषय मांडणार आहे. मी शिवसैनिक आहे. म्हणून सोमय्यांना आव्हान देतो की, त्यांनी इथे यावं आम्ही शिवसैनिक त्याचं स्वागत करायला तयार आहोत असंही अनिल परब म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.