ST Employee Strike : शरद पवारांच्या घरावर भिरकवलेली चप्पल पडली कर्मचाऱ्यांच्या भाकरीवर; नोकरी जाणार

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 10, 2022 | 15:45 IST

काही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख  (NCP chief) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावर (Residence) हल्ला केला होता. यावर सरकारने कारवाई करण्याचे ठरवले असून त्यांना पुन्हा सेवेत घेतलं जाणार नसल्याचं परिवहन मंत्री (Transport Minister)अनिल परबांनी (Anil Parab)    सांगितले आहे. 

Anil parab
हल्लेखोर कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार नाही - परबांची माहिती  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शरद पवार यांच्या घराला घेराव घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल
  • कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू केलं जाणार नाही- अनिल परब
  • 22 एप्रिलपर्यत नोकरीवर न आल्यास एसटी महामंडळात कंत्राटी केली जाण्याची शक्यता.

मुंबई: गेल्या पाच महिन्यांपासून विलीनीकरणासाठी (Merger) एसटी कामगारांचा (ST workers) संप (Strike) सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) विलीनीकरणाची मागणी मान्य केली नसली तरी इतर सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तसेच संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर (employees) कोणतीच कारवाई करू नये असेही निर्देश न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचारी आनंदी होते. परंतु परवा दिवशी काही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख  (NCP chief) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावर (Residence) हल्ला केला होता. यावर सरकारने कारवाई करण्याचे ठरवले असून त्यांना पुन्हा सेवेत घेतलं जाणार नसल्याचं परिवहन मंत्री (Transport Minister)अनिल परबांनी (Anil Parab)    सांगितले आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन सध्या राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. परव्याच्या दिवशी कर्मचाऱ्यांनी सिल्हर ओकवर धावा बोलत दगड आणि चपल्ला भिरकावल्या. परंतु ह्या भिरकावलेल्या या चप्पला आता त्यांच्याच भाकरीवर पडल्या आहेत. शरद पवार यांच्या घराला घेराव घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले असून त्यांना सेवेत घेणार नाही, अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.यासंदर्भात माहिती देताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की,  येत्या 22 तारखेपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कोर्टाचे आहेत. 22 तारखेपर्यंत जे कामगार रुजू होतील त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही.

परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना सेवेत घेता येणे शक्य नाही. तर इतर कर्मचारी  22 तारखेपर्यंत कामगार कामावर आले नाहीत तर एसटीमध्ये कंत्राटी खासगीकरण ही करता येईल का याचा विचार ही केला जाणार आहे. 5 महिने बंद असलेल्या बस पूर्ववत करण्यासाठी बस अगाराने पूर्ण बसेसची तपासणी केली आहे. एस टी महामंडळ बस सेवा सुरू करण्यासाठी पूर्ण पणे सज्ज असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. 

पोलीस अधिकाऱ्याची उचलबांगडी

या हल्ल्याच्या तपासादरम्यान काही वेगवान हालचाली घडत असताना आता गामदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजभर यांनाही हटवण्यात आले आहे. याआधी या घटनेनंतर पोलीस उपायुक्त योगेश कुमार गुप्ता यांची बदली करण्यात आली होती. या मोर्चाची माहिती मीडियाला मिळाली मात्र पोलिसांना याची खबर का नव्हती, असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला आहे. पोलिसांची भूमिका संशयित असल्याचं आरोप होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी