टीका केल्यानंतर अंजली दमानियांनी राज ठाकरेंना पाठवला 'हा' मेसेज

मुंबई
सुनिल देसले
Updated Aug 22, 2019 | 21:29 IST

Anjali Damania message to Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक मेसेज पाठवला आहे. नेमकं काय म्हटलं आहे या मेसेजमध्ये पाहूयात...

Anjali Damania sent message to MNS chief Raj Thackeray
अंजली दमानिया, मनसे अध्यक्ष राज ठाकरे 
थोडं पण कामाचं
  • गुरुवारी राज ठाकरे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात झाले होते दाखल
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ईडीने चौकशीसाठी बोलावल्यावर दमानियांनी केली होती टीका
  • त्यानंतर अंजली दमानिया यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पाठवला मेसेज
  • मेसेज पाठवून राज ठाकरेंना विचारलं त्यांचं मतं
  • राज ठाकरेंवर टीका करताच अंजली दमानियांना केलं होतं ट्रोल

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणात ईडीने गुरुवारी (२२ ऑगस्ट) चौकशीसाठी बोलावलं. यानंतर गुरुवारी सकाळीच राज ठाकरे आपल्या परिवारासह ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाल्याचं पहायला मिळालं. राज ठाकरेंसोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब ईडीच्या कार्यालयाकडे जात असल्याची दृष्य सर्वत्र दिसली. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज ठाकरेंवर खोचक टीका करत म्हटलं, 'राज ठाकरे ईडीच्या चौकशीला चालले आहेत की सत्यनारायणाच्या पुजेला?'.

राज ठाकरेंवर अंजली दमानिया यांनी केलेल्या या टीकेनंतर त्यांना मनसे कार्यकर्त्यांनी चांगलंच ट्रोल केलं. यानंतर अंजली दमानिया यांनी रात्री राज ठाकरेंना एक मेसेज पाठवला आहे. अंजली दमानिया यांनी राज ठाकरेंना जो मेसेज पाठवला आहे त्याचा स्क्रीन शॉटही त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

काय म्हटलंय मेसेजमध्ये? 

नमस्कार, 
मी सौ अंजली दमानिया, 
आज मी आपल्या विरुद्ध एक ट्विट केलं की आज आरण जे सहकुटुंब गेलात त्यावर, 'EDच्या चौकशीला निघालात की सत्यनारायणाच्या पूजेला' ह्यावर आपल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन trolling केलं. Whatsapp वर पाठवत आहे.
आपणही आपल्या भाषणात अनेकांना कधी अस्वल म्हणता तर काहींची टिंगल उडवता, मग नुसतं एवढं म्हटलं तर काय बिघडलं? 
मी लोकशाङीत राहते, मला माझे views बाळगण्याचा व मांडण्याचा हक्क आहे. आज माझ्यावर झालेल्या trolling बद्दल आपल्याला काय वाटते ते कळवावे. 
धन्यवाद.

 

 

कोहिनूर मिल प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने चौकशीसाठी (२२ ऑगस्ट) रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज (२२ ऑगस्ट) रोजी राज ठाकरे मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. राज ठाकरेंची ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल साडे आठ तास चौकशी केली.

मनसे कार्यकर्ते संतप्त

राज ठाकरेंना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावल्यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी २२ ऑगस्ट रोजी ठाणे बंदची हाक दिली होती. मात्र, राज ठाकरेंनी हा बंद मागे घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंसोबत ईडीच्या कार्यालयाबाहेर जाण्याचा निर्धार केला मात्र, त्यालाही राज ठाकरेंनी विरोध केला होता. या संदर्भात राज ठाकरेंनी ट्विटरवरुन मनसेच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहनही केलं होतं. तर ठाण्यातील एका मनसे कार्यकर्त्याने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी