आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीवर अंजली दमानियांचं विनोदी ट्विट

मुंबई
पूजा विचारे
Updated Oct 14, 2019 | 16:15 IST

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विनोदी ट्विट करत खिल्ली उडवली आहे. आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

aditya and uddhav thackeray
आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीवर अंजली दमानियांचं विनोदी ट्विट  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विनोदी ट्विट करत खिल्ली उडवली आहे.
  • आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.
  • . आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे आहेत.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विनोदी ट्विट करत खिल्ली उडवली आहे. आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे आहेत. त्यामुळे सध्या त्यांची जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यातच आदित्य ठाकरे सध्या वरळी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढताहेत. रविवारी त्यांचा भव्य रोड शो झाला. यावरूनच दमानिया यांनी त्यांच्यावर लक्ष्य केलं आहे. 

एकीकडे वरळीमधून आदित्य यांचा विजय निश्चित मानला जातोय. त्यातच स्वतःहून आदित्य ठाकरेंनी विजय संकल्प मेळाव्यात आपण निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यावेळी संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंना शिवसेनेचा सूर्ययान असं कौतुक केलं. त्यातच आदित्य ठाकरेंचा विजय निश्चित मानला जातोय तर दुसरीकडे त्यांच्यासमोर कोणीही प्रबळ प्रतिस्पर्धी उमेदवार नाही आहे आणि हाच मुद्दा पकडून अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर खोचक शब्दात टीका केली.  

अंजली दमानिया यांनी ट्विट केलं की, 

मुलगा-  बाबा मी शर्यतीत १ला आलो

बाबा-  अरे वा मग २ रा आणि ३ रा कोण?

मुलगा-  कोणी नाही मी एकटाच धावत होतो 

वरळी मतदारसंघात 

अंजली दमानिया यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता हे ट्विट केलं आहे. ट्विटच्या शेवटी वरळी मतदारसंघात, असं दमानिया यांनी लिहिलं आहे. त्यामुळे हे ट्विट आदित्य ठाकरे यांच्यासाठीच असल्याचं सूचित होतं आहे. त्याच्या या ट्विटची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

वरळीत आजपर्यंत शिवसेनेचे वर्चस्व आहे. शिवसेनेनं आदित्य यांच्या विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. आजी-माजी आमदार, कार्यकर्ते आदित्यच्या प्रचारासाठी खूप मेहनत घेत आहेत.  विद्यमान आमदार सुनील शिंदे यांच्यासह सर्व नगरसेवक शिवसेनेचे आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे वरळीतून निवडणूक लढवण्याचा आदित्य ठाकरेंचा मार्ग आणखीन सोपा झाला. 

त्यातच वरळीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उमेदवार जाहीर केला नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरेश माने यांना मैदानात उतरवलं आहे आणि बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेनं अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे सोडले तर वरळीत जबरदस्त उमेदवार दिसत नसल्यानं त्यांचा विजय निश्चितच आहे असं बोललं जातंय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी