शिंदे गटाचा आणखी एक दणका, 12 खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. सुरूवातीला 40 आमदारांना घेऊन नव्याने सरकार स्थापन करणारे एकनाथ शिंदे आता शिवसेनेला लोकसभेतही दणका देण्याच्या तयारीत दिसत आहे

Another blow from the Shinde group, 12 MPs to form a separate group?
शिंदे गटाचा आणखी एक दणका, 12 खासदारांचा स्वतंत्र गट? 
थोडं पण कामाचं
 • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे.
 • सुरूवातीला 40 आमदारांना घेऊन नव्याने सरकार स्थापन करणारे एकनाथ शिंदे आता शिवसेनेला लोकसभेतही दणका देण्याच्या तयारीत दिसत आहे
 • शिवसेनेचे 12 खासदार नव्याने स्वतंत्र गट तयार करून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना उद्या भेटणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. 

मुंबई :   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. सुरूवातीला 40 आमदारांना घेऊन नव्याने सरकार स्थापन करणारे एकनाथ शिंदे आता शिवसेनेला लोकसभेतही दणका देण्याच्या तयारीत दिसत आहे. शिवसेनेचे 12 खासदार नव्याने स्वतंत्र गट तयार करून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना उद्या भेटणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. 

अधिक वाचा : अनेकांना घायाळ करणारी चंद्रमुखीची अदा

मुंबईतील ट्रायटंड हॉटेलमध्ये आज शिंदे गटाच्या 40 आमदारांची बैठक झाली. या बैठकीला ऑनलाइन पद्धतीने शिवसेनेचे 12 खासदार उपस्थित होते.
या बारा खासदारांची नावे पुढील प्रमाणे 

 1. सदाशिव लोखंडे - शिर्डी 
 2. राजेंद्र गावित - पालघर, 
 3. श्रीकांत शिंदे - कल्याण डोंबिवली , 
 4. राहुल शेवाळे - दक्षिण मध्य मुंबई, 
 5. कृपाल तुमाने - रामटेक
 6. भावना गवळी - यवतमाळ, 
 7. हेमंत गोडसे - नाशिक,  
 8. हेमंत पाटील - हिंगोली, 
 9. श्रीरंग बारणे - मावळ, 
 10. संजय मंडलिक - कोल्हापूर, 
 11. धैर्यशील माने - हातकणंगले, 
 12. संजय जाधव - परभणी

अधिक वाचा : अभिनेत्री साई पल्लवीविषयी काही खास गोष्टी, ज्या नाही सर्वांना माहिती

या बारा खासदारांनी उद्धव ठाकरे यांनी साथ सोडून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.  या 12 खासदारांच्या गटनेतेपदी भावना गवळी आणि प्रतोद पदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

या बैठकीत शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याची माहिती आहे. परंतु या बैठकीत असे काहीच झाले नाही, अशा वृत्ताचे खंडन शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहेत. अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नये असेही केसरकर ठामपणे सांगितले. 

या बैठकीत मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षप्रमुखपदाला मात्र हात लावला नाही. 

अधिक वाचा : सुष्मिता सेन आहे खूपच चर्चेत, जाणून घ्या तिच्याविषयी खास गोष्टी

सेनेची राष्ट्रीय कार्यकारणी शिंदेकडून बरखास्त करण्यात आली आहे. प्रवक्तेपदी दीपक केसरकर यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांना हा मोठा एक दणका मानला जात आहे. 

शिवसेनेच्या नेते पदी आनंदराव अडसूळ,शिवाजी आढळराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

शिवसेनेचे उपनेते म्हणून उदय सामंत, तानाजी सावंत, शरद पोंक्षे, विजय नहाटा, गुलाबराव पाटील, यशवंत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी