मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून दोघांनी मारल्या उड्या, पण...

मुंबई
Updated Sep 18, 2019 | 18:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

 राज्यातील अपंगांच्या शाळांना अनुदान वाढावे या मागणीसाठी आज सायंकाळी दोघांनी मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर उडी मारली, पण पहिल्या मजल्यावर असलेल्या संरक्षक जाळीवर तो पडल्याने त्याचे प्राण वाचले.

Another suicide attempt at Mantralaya but they fell on the safety net installed news in marathi
मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून अपंग युवकाने मारली उडी 

थोडं पण कामाचं

  •  राज्यातील अपंगांच्या शाळांना अनुदान वाढावे या संस्थाचालक हेमंत पाटील(चाळीसगाव) आणि अरुण नेटोरे यांनी मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर उडी
  • राज्याातील अनेक अपंगाच्या शाळांना वाढीव अनुदान मिळालेले नाही.
  • आचारसंहिता लागू व्हायला एक किंवा दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे हा निर्णय आता पुढील दीड महिन्यासाठी लांबणीवर पडेल, या निराशेतून तरूणाने उचलले पाऊल

मुंबई :  राज्यातील अपंगांच्या शाळांना अनुदान वाढावे या मागणीसाठी आज सायंकाळी दोन व्यक्तींनी मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केले, पण पहिल्या मजल्यावर असलेल्या संरक्षक जाळीवर ते पडल्याने त्यांचे प्राण वाचले. सध्या या दोघांना मंत्रालयातील सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले आहे. 
 
 राज्याातील अनेक अपंगाच्या शाळांना वाढीव अनुदान मिळालेले नाही. हे अनुदान मिळावे या मागणीसाठी राज्यभरातील अनेक शिक्षक आणि संस्थाचालक आज मंत्रालयात आले होते. पण त्यांच्या या मागण्यांवर आज कोणताही निर्णय झाला नाही.  आचारसंहिता लागू व्हायला एक किंवा दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे हा निर्णय आता पुढील दीड महिन्यासाठी लांबणीवर पडेल या निराशेतून एक संस्थाचालक हेमंत पाटील(चाळीसगाव) आणि अरुण नेटोरे यांनी मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उड्या घेतल्या. सुदैवाने यापूर्वी झालेल्या घटनामुळे मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर एक सुरक्षा जाळी लावण्यात आली आहे. त्या जाळीवर हे दोघे नागरीक पडले आणि त्याचे प्राण वाचले. दोघे जाळीवर पडल्यावर मंत्रालयातील सुरक्षा रक्षकांची धावपळ झाली. त्यांनी तात्काळ सुरक्षा जाळीवर जाऊन दोघांना ताब्यात घेतले. 

दिव्यांगाच्या कायम विना अनुदानित शाळांचा "कायम" शब्द काढण्यासाठी गेले अनेक वर्षांपासून लढणाऱ्या शिक्षक संस्थाचालक आणि शिक्षकांनी आज मंत्रालयात सामाजिक न्यायमंत्री सुरेश  खाडे यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या, तर एक संस्थाचालक हेमंत पाटील(चाळीसगाव) आणि अरुण नेटोरे यांनी मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळीवर उडी मारून आंदोलन केले.यामुळे पोलीस यंत्रणेची जोरदार पळापळ झाली.

 


 यापूर्वीही मंत्रालयात असे प्रकार घडले आहे.  एका नागरिकाने मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारल्यामुळे प्राण गमावले होते. त्यानंतर मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर सुरक्षा जाळी लावण्यात आली होती. त्यानंतरही अनेकांनी या जाळीवर उड्या घेऊन आपल्या मागण्यासाठी लक्ष वेधले होते. 

 

 


 
 येत्या काही दिवसात राज्यात निवडणुका जाहीर होतील त्यामुळे आपली कामे करण्यासाठी राज्यातील विविध भागातून अनेक नागरीक आज मंत्रालयात दाखल झाले होते. हे काम आज उद्यामध्ये झाले नाही तर आचारसंहिता लागेल, मग पुढील दीड महिना काम होणार नाही. त्यामुळे आपल्या मागण्या पुढच्या सरकारपुढे नव्याने मांडव्या लागतील. ही भीती अनेकांच्या मनात होती त्यामुळे त्यांनी मंत्रालय गाठले होते. 
 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...