Antilia Explosive Case : स्कॉर्पिओ पार्क केल्यानंतर पीपीई किट घालून पळाला  संशयित? सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद

मध्यरात्री  पीपीई किट परिधान करुन रस्त्यावर एक व्यक्ती का फिरत होता हे शोधून काढण्यासाठी तपास यंत्रणे प्रयत्न करीत आहेत. रस्त्यावर पीपीई किट परिधान केलेली व्यक्ती त्याच स्कॉर्पिओचा ड्रायव्हर असू शकेल का?

antilia explosive case suspect wearing ppe kit after parking scorpio seen in cctv footage
अँटेलियाबाहेर पीपीई किटमध्ये फिरत होता एक व्यक्ती (CCTV) 

मुंबई : गेल्या महिन्यात उद्योगपती अनिल अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक सापडल्याच्या प्रकरणात तपास यंत्रणांना एक सीसीटीव्ही फुटेज सापडले आहे.  त्यादिवशी एक व्यक्ती पीपीई किट परिधान करुन रस्त्यावर फिरताना दिसला. मध्यरात्री हा माणूस पीपीई किट परिधान करुन रस्त्यावर का फिरत होता हे शोधून काढण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्न करीत आहेत. रस्त्यावर पीपीई किट परिधान केलेली व्यक्ती कदाचित त्याच स्कॉर्पिओचा ड्रायव्हर असू शकते ज्यात स्फोटके सापडले होते आणि त्यानेच अंबानींच्या घराबाहेर स्कॉर्पिओ पार्क केली असावी असा संशय तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आहे.  

तपास यंत्रणांना असा संशय आहे की नंतर त्याच व्यक्तीने इनोव्हा मधील मुलुंड टोल नाका ओलांडला पण तो कारच्या मागील बाजूस लपला होता तर इनोव्हा चालकाने तोंडावर एक मास्क  आणि चेहरा फेस शिल्डने झाकला होता आणि म्हणून ते ओळखले गेले नाहीत. 

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक सापडल्याची घटना दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत चालली आहे. ज्या स्कार्पिओ कारमध्ये स्फोटके सापडलेली, त्या कारचा मालक मनसुख हिरेन याची हत्या केल्याचा आरोप आहे आणि तपास यंत्रणांनी त्याचे 2 फोनही ट्रेस केले आहेत. मात्र पहिला फोन विरारच्या मांडवी येथे सापडला आहे तर दुसरा फोन वसई भागात ट्रेस केला आहे. हे दोन्ही फोन मनसूख हिरेनचा मृतदेह सापडलेल्या ठिकाणाहून खूप दूर असलेल्या ठिकाणी सापडले आहेत. 

हिरेनच्या मृत्यूमुळे आणि मुकेश अंबानी यांच्या घरात सापडलेल्या स्फोटकेमुळे महाराष्ट्राचे राजकारणही तापले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले की हिरेनच्या पत्नीने मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी