SSC दहावीच्या परीक्षेसाठी १८ नोव्हेंबरपासून आवेदनपत्रे स्वीकारली जाणार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 17, 2021 | 18:27 IST

Applications will be accepted from November 18 for the SSC examination महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार १८ नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत.

Applications will be accepted from November 18 for the SSC examination
SSC दहावीच्या परीक्षेसाठी १८ नोव्हेंबरपासून आवेदनपत्रे स्वीकारली जाणार 
थोडं पण कामाचं
  • SSC दहावीच्या परीक्षेसाठी १८ नोव्हेंबरपासून आवेदनपत्रे स्वीकारली जाणार
  • विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत
  • शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट मंगळवार ४ जानेवारी २०२१ रोजी जमा कराव्या

Applications will be accepted from November 18 for the SSC examination । मुंबईः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार १८ नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यामध्ये माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह गुरूवार १८ नोव्हेंबर ते गुरूवार ९ डिसेंबर २०२१ या कालावधीत भरावयाची आहेत. तर माध्यमिक शाळांनी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे शुक्रवार १० डिसेंबर ते सोमवार २० डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत. विलंब शुल्कासह हे अर्ज सोमवार २० डिसेंबर ते मंगळवार २८ डिसेंबर २०२१ या कालावधीत भरता येतील. तर, माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी गुरूवार १८ नोव्हेंबर ते गुरूवार ३० डिसेंबर २०२१ असा आहे.

माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट मंगळवार ४ जानेवारी २०२१ रोजी जमा करावयाची आहे. आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी