Mumbai Crime: महागडा मोबाइल सोशल मीडियावरुन स्वस्तात खरेदी करताय? मग थांबा अन्यथा मिळतील बटाटे, कांदे

Be aware while buying online mobile: सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही महागडा मोबाइल अगदी स्वस्तात खरेदी करण्याचा विचार करताय? मग त्यापूर्वी जरा ही बातमी वाचा.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर महागडा मोबाइल स्वस्तात विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
  • बोगस मोबाइल विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश
  • तुम्हीही ऑनलाईन माध्यमातून मोबाइल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग ही बातमी वाचाच

Mumbai police nabbed a gang who cheated people on name of selling smartphone in cheap rate: सध्याच्या काळात मोबाइल आणि त्यातल्या त्यात स्मार्टफोन हा जवळपास प्रत्येकाच्याच हातात पहायला मिळतो. चांगला दिसणारा, महागडा, उत्कृष्ट कॅमेरा असलेला स्मार्टफोन आपल्याकडे असावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र, चांगल्या कंपनीचे स्मार्टफोन हे महाग असल्याने अनेकांना घेणं शक्य होत नाही. पण नागरिकांचा हाच मुद्दा लक्षात घेत चोरट्यांनी ऑनलाईन माध्यमातून (Online platform) नागरिकांना लुबाडण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. अशाच एका टोळीला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. जे सोशल मीडियाच्या माध्यमातून महागडे मोबाइल स्वस्तात देण्याचा दावा करत नागरिकांना गंडा घालत होते. (are you buying costlier mobile in cheap rate via social media then wait otherwise you will fall in the trap)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महागडे अँड्रॉईड मोबाइल स्वस्तात विकण्याचे निवेदन देऊन ग्राहकांना आमिष दाखवणाऱ्या गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट 11 ने अटक केली आहे. जेव्हा एखादा ग्राहक मोबाइल मिळविण्यासाठी या मेमोरँडम लिंकवरील फॉर्ममध्ये आपला तपशील भरतो, त्याचवेळी त्याला मुंबईत सुरू असलेल्या कॉल सेंटरमधून फोन यायचा.

अधिक वाचा : कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्यासाठी आमदारांकडे १०० कोटी रुपयांची मागणी, ४ जणांना अटक

फोन करणारा व्यक्ती सांगायचा की, हा मोबाइल कॅश ऑन डिलिव्हरी तुम्हाला तुम्ही दिलेल्या पत्त्यावर मिळेल. हे लोक कधी ग्राहकांना स्वस्तातले जुने मोबाइल पॅक करून पाठवतात, तर कधी मोबाईल ऐवजी बटाटे, दगड पाठवतात. विशेष म्हणजे हे लोक मुंबईबाहेर राहणाऱ्या अशा ग्राहकांना टार्गेट करायचे. ज्यामध्ये सर्वाधिक ग्राहक यूपी आणि बिहार आणि झारखंडमधील आहेत ज्यांना गोवण्यात आले आहे.

अधिक वाचा : Mumbai Crime: मुंबईतील घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला नवऱ्याचा मृतदेह तर पत्नी...

गुन्हे शाखा युनिट 11 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली एका कॉल सेंटरवर छापा टाकून 3 हजारांहून अधिक जुन्या मॉडेलचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. महागड्या मोबाइलचे फोटो फेसबूकवर टाकून महागडे मोबाइल स्वस्तात विकण्याचा दावा करणारे काही लोक असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

अशा तक्रारीनंतर गुन्हे शाखेच्या पथकाने पीआय पाटील व त्यांच्या पथकाने छापा टाकून तीन हजारांहून अधिक मोबाइल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करून अनेक गुन्हेगारांना अटक केली. या प्रकरणी गुन्हे शाखेने कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या २५ हून अधिक तरुणींना ताब्यात घेतले असून त्यांचे जबाब नोंदवत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व मुलींना साक्षीदार बनवून आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास करणार आहोत अशी माहिती पोलिकांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी