Mumbai : highly educated safai kamgar : मुंबई महापालिकेत एक हजार उच्चशिक्षित सफाई कामगार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 02, 2021 | 10:46 IST

BMC Highly Educated Safai karmchari : कोरोना संकट, आर्थिक आव्हान, सुरक्षित सरकारी नोकरीसाठी केलेली अपयशी धडपड, उच्चशिक्षित असले तरी व्यावसायिक कौशल्यांचा अभाव, संवाद कौशल्याचा अभाव अशा वेगवेगळ्या कारणांमुळे उच्चशिक्षित असूनही सफाई कामगार (safai kamgar) म्हणून मुंबई महापालिकेत (bmc/mcgm) काम करण्याची वेळ सुमारे एक हजार तरुणांवर आली आहे.

around one thousand highly educated working in bmc as a safai kamgar
मुंबई महापालिकेत एक हजार उच्चशिक्षित सफाई कामगार 
थोडं पण कामाचं
  • मुंबई महापालिकेत एक हजार उच्चशिक्षित सफाई कामगार
  • सरकारी नोकरी असल्याने उद्या वरच्या पदावर पोहोचता येईल, या आशेने उच्चशिक्षितांनी नोकरी पत्करली
  • ...पण शिक्षणाचा आणि अनुभवाचा उपयोग महापालिकेत करुन घेता येत नाही

Cleaning Workers Education : । मुंबईः कोरोना संकट, आर्थिक आव्हान, सुरक्षित सरकारी नोकरीसाठी केलेली अपयशी धडपड, उच्चशिक्षित असले तरी व्यावसायिक कौशल्यांचा अभाव, संवाद कौशल्याचा अभाव अशा वेगवेगळ्या कारणांमुळे उच्चशिक्षित असूनही सफाई कामगार (safai kamgar) म्हणून मुंबई महापालिकेत (bmc/mcgm) काम करण्याची वेळ सुमारे एक हजार तरुणांवर आली आहे.

एरवी शिकला नाहीस तर रस्त्यावर झाडू मारावा लागेल, रस्त्यावर झाडू मारायचा नसेल तर शिक आणि मोठा हो... असे मोठ्यांच्या तोंडून मुलं ऐकत असतात. पण आज उच्च शिक्षण घेऊनही सुमारे एक हजार तरुणांवर मुंबई महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करण्याची वेळ आली आहे.

उच्च शिक्षित असूनही कमी शिकलेल्यांसोबत रस्त्यावर स्वच्छता राखणे, कचरा उचलणे, झाडू मारणे अशा स्वरुपाची कामं करावी लागत आहेत. यामुळे आता उच्च शिक्षित सफाई कामगारांना सहकाऱ्यांकडून शिकून काय मोठे दिवे लावले, अशा स्वरुपाचे टोमणे ऐकून घ्यावे लागत आहे. 

उच्च शिक्षित सफाई कामगारांना त्यांच्या शिक्षणाचा, अनुभवाचा फायदा करुन देण्याची संधी महापालिकेत अद्याप मिळालेली नाही. महापालिका प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे सफाई विभागात २८ हजार कामगार आहेत. यापैकी सुमारे एक हजार कामगार उच्च शिक्षित आहेत. कोणी अनुकंपा तत्वावर, तर कोणी चतुर्थ श्रेणीमध्ये कामाला लागले. त्यांना त्यांच्या शिक्षणाचा आणि अनुभवाचा उपयोग महापालिकेत करुन घेता येत नाही. 

पोटाची खळगी भरण्यासाठी शिक्षणाला साजेशी नसली तरी सरकारी नोकरी असल्याने महापालिकेच्या सफाई खात्यातून आज ना उद्या वरच्या पदावर पोहोचता येईल, या आशेने उच्चशिक्षितांनी नोकरी पत्करली. पण त्यांना त्यांच्या शिक्षणाचा आणि अनुभवाचा उपयोग महापालिकेत करुन घेता येत नाही. मनपा प्रशासनही या बाबीकडे गंभीरपणे बघताना दिसत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी