MSC पर्यंत शिक्षण, चांगली नोकरी, पण आई-वडिलांशी भांडण झाल्याने स्विकारला हा मार्ग...

Mumbai Police : उच्चशिक्षित असलेल्या हा चोरटा दर गुरुवारी अहमदाबादहून मुंबईला यायचा, रात्री 5 ते 6 दुकानात चोरी करुन खासगी वाहन पकडून अहमदाबादला परतत होता.

arrested the master thief who has stolen from more than 56 shops so far.
MSC पर्यंत शिक्षण, चांगली नोकरी, पण आई-वडिलांशी भांडण झाल्याने स्विकारला हा मार्ग...  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गोरेगाव ते दहिसरपर्यंत चोरीची घटना घडत होत्या
  • चोरटा चोरी करुन गुजरात गाठायचा
  • दर गुरुवारी तो बस किंवा इतर वाहनांमुळे मुंबईत यायचा

मुंबई : मुंबईमधील अनेक दुकानांच्या चोरी प्रकरणी पोलीस ज्याच्या शोधात होते, असा एक 30 वर्षीय चोरटा बोरिवली येथील एका दुकानात घुसण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पोलिसांनी गस्तीवर पकडले. तो फक्त दर गुरुवारी दुकानात चोरी करायचा आणि चोरी असताना फक्त रोकड चोरत असे इतर कोणत्याही वस्तूला हात लावत नव्हता. (arrested the master thief who has stolen from more than 56 shops so far.)

अधिक वाचा : cows died विजेचा धक्का लागून तब्बल ६ गायी आणि ४ वासरांचा मृत्यू, ७०० ते ८०० साड्या नेसवून दिला भावपूर्ण निरोप

डिसेंबर २०२१ पासून गोरेगाव ते दहिसरपर्यंत चोरीची घटना घडत होत्या. सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना, आम्हाला एक व्यक्ती दिसला, ज्याने स्वतःला पूर्णपणे झाकून ठेवले होते, तो दुकानात आणि घरात घुसला होता. फक्त त्याचे डोळे दिसू शकतात. गोरेगाव, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर येथील पोलिस अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु काही कारणास्तव तो सापडत नव्हता.  

अधिक वाचा : Nitin Gadkari : विहिरीत उडी मारून जीव देईन पण, नितीन गडकरी असे का म्हणाले? वाचा सविस्तर

बोरिवली पोलिस स्टेशनचे अधिकारी विजय मांडे म्हणाले, “तो मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये नव्हता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याचे पूर्णपणे चेहरा झाकलेले फोटो कॅप्चर झाल्यामुळे आम्हाला कोणताही सुगावा मिळणे अशक्य झाले होते.”

नऊ महिने पोलिसांपासून पळ काढण्यात यशस्वी ठरलेल्या चोरटा अजित अर्जुन पिल्लई हा CCTV कॅमेरात चेहरा दिसून नये म्हणून तोंडाला मास्क आणि हुडी घालून तो चोरी करायच्या प्रयत्नात असताना पोलिसांना रंगेहात सापडला. पोलिस पथकाने त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून चोरीची काही हत्यारे सापडली. त्याच्याकडे चौकशी केली असता, पिल्लई हा अहमदाबाद येथील रहिवासी असून त्याचे सांख्यिकी विषयात एमएससी पर्यंत शिक्षण केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्याच्याकडे नोकरी होती का आणि त्याने हा गुन्हा का केला याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कौटुंबिक समस्यांमुळे आपण हा गुन्हा केल्याची त्याने कबुली दिली. 

अधिक वाचा : Aurangabad Crime News : अन् कुस्तीच्या आखाड्यात दोन गटात कुस्तीऐवजी सुरू झाली तुंबळ हाणामारी

तपासादरम्यान पिल्लई हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांना समजले. त्याच्यावर अहमदाबाद पोलिसांत ३५ गुन्हे दाखल असून त्याला चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. तो अहमदाबाद पोलिसांच्या रडारवर असल्याने त्याने आपला मोर्चा मुंबईला हलवण्याचा निर्णय घेतला. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांने मुंबई गाठली.

उपनिरीक्षक इंद्रजित पाटील म्हणाले, “चोरी केल्यानंतर आरोपी आपली दुचाकी शहरात सोडून अहमदाबादला बसमध्ये चढायचा. मग तो एक-दोन आठवड्यांच्या अंतराने शहरात परत यायचा.” या प्रकरणाचा तपास बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी