Arun Gawli family members join Shiv Sena, Chief Minister Eknath Shinde new political move : तुमच्याकडे दाऊद इब्राहीम तर आमच्याकडे आमचा अरुण गवळी असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जाहीरपणे म्हणाले होते. आता त्याच अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या कुटुंबातील सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ही शिवसेनेचे मुख्यनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवी खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
अंडरवर्ल्डमध्ये डॅडी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अरुण गवळीचा भाऊ प्रदीप गवळी, आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर दगडी चाळ येथे राहणाऱ्या अनेक गवळी समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला. गवळी कुटुंबातील सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे भायखळ येथील शिवसेनेचे वर्चस्व आणखी वाढेल असा अंदाज व्यक्त होत आहे.
अवघ्या सहा सात महिन्यांत बाळासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या सर्वांचे शिवसेनेत स्वागत आहे. हे सरकार सामान्यांचे आहे. राज्याला पुढे घेऊन जाणारे सरकार आहे. राज्याचा सर्वांगीण विकास करणारे सरकार आहे; असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह यावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाव्याला वैध ठरविणारा निर्णय दिला. यानंतर शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांच्या संख्येत हळू हळू वाढ होत असल्याचे चित्र आहे.
चाळीशीनंतर स्टॅमिनासाठी पुरुषांनी खायचे पदार्थ
कच्ची पपई खा आणि अनेक आजारांपासून लांब राहा
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर विभागातील सेंचुरी रेयॉन कंपनीतील कर्मचाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत स्वागत केले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.