आर्यन खान केसशी संबंधित प्रभाकरचा मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 02, 2022 | 10:40 IST

Aryan Khan case, NCB witness Prabhakar Sail dies of heart attack : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्याशी संबंधित केसमध्ये महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या प्रभाकर याचा मृत्यू झाला.

Aryan Khan case, NCB witness Prabhakar Sail dies of heart attack
आर्यन खान केसशी संबंधित प्रभाकरचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • आर्यन खान केसशी संबंधित प्रभाकरचा मृत्यू
  • प्रभाकरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
  • मुंबईत चेंबूरच्या माहुल परिसरात घडली घटना

Aryan Khan case, NCB witness Prabhakar Sail dies of heart attack : मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्याशी संबंधित केसमध्ये महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या प्रभाकर याचा मृत्यू झाला. प्रभाकरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, असे त्याच्या वकिलाने सांगितले. चेंबूरच्या माहुल परिसरात असताना प्रभाकरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला; अशी माहिती वकील तुषार खंडारे यांनी दिली.

कॉर्डेलिया क्रुझ ड्रग केसमध्ये (Cordelia cruise drug case) एनसीबीने आर्यन खान याला ३ ऑक्टोबर २०२१ रोजी अटक केले होते. या प्रकरणात आर्यन सध्या जामिनावर जेलबाहेर आहे. कोर्टाने एनसीबीला आरोपपत्र दाखल करण्यासाठी अतिरिक्त कालावधी दिला आहे. नियमानुसार आर्यन प्रकरणात एनसीबीला २ एप्रिल २०२२ पर्यंत आरोपपत्र दाखल करण्याचे बंधन होते. पण तांत्रिक पुरावे सादर करण्यासाठी जास्त वेळ हवा असल्याचे कारण देत एनसीबीने अतिरिक्त कालावधी देण्याची विनंती कोर्टाला केली होती. मुंबईच्या सेशन्स कोर्टाने (सत्र न्यायालय) ही विनंती मान्य करून एनसीबीला आणखी साठ दिवसांचा कालावधी दिला आहे. पण प्रभाकरचा मृत्यू झाल्यामुळे केसशी संबंधित एक महत्त्वाचा साक्षीदार उपलब्ध नसेल. याचा काय परिणाम होणार हे एनसीबीकडून अद्याप समजलेले नाही. 

ड्रग केसमध्ये एनसीबीने आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमुम धमेचा यांच्यासह १५ जणांना अटक केली होती. काही व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे एनसीबीने आर्यनचा संबंध आंतरराष्ट्रीय ड्रॅग रॅकेटशी असल्याचा आरोप केला. या प्रकरणाशी संबंधित प्रभाकरचा मृत्यू झाल्यामुळे पुढे काय होणार अशा चर्चेला उधाण आले आहे.

प्रभाकरचे पार्थिव आज (शनिवार २ एप्रिल २०२२) सकाळी अंधेरीच्या घरी आणले जाईल. तिथे अंत्यदर्शन होईल, यानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

कोण होता प्रभाकर ?

कॉर्डेलिया क्रुझ ड्रग केसमध्ये प्रभाकर हा एनसीबीचा एक साक्षीदार होता. एनसीबीचा आणखी एक साक्षीदार किरण गोसावी याचा पर्सनल बॉडीगार्ड म्हणून प्रभाकर त्याच्यासोबत होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी