Aryan Khan Drugs Case : ड्रग्स प्रकरणात कशी होत-होती वसुली, SITच्या चौकशीत धक्कादायक खुलासा, काय होती गोसावी अन् समीरची भूमिका

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 09, 2021 | 12:59 IST

Aryan Khan Drugs Case : ड्रग्स प्रकरणात (Drugs Case) शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यनचं (Aryan Khan) नाव आल्यानं रोज नव-नवीन खुलासे होत आहेत.

Aryan Khan Drugs Case
ड्रग्स प्रकरणात कशी होत-होती वसुली, SITच्या चौकशीत खुलासा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • एसआयटीला अद्याप तपासात समीर वानखेडे किंवा एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा सहभाग आढळला नाही.
  • एनसीबीच्या नावाने होत होती वसुली
  • पूजा ददलानीला एनसीबी अधिकारी असल्याचं गोसावीनं भासवलं.

Aryan Khan Drugs Case : मुंबई : ड्रग्स प्रकरणात (Drugs Case) शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यनचं (Aryan Khan) नाव आल्यानं रोज नव-नवीन खुलासे होत आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (Narcotics Control Bureau) (एनसीबी) नावाने काही जणांनी वसुली केल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) विशेष तपास पथकाच्या (Special Investigation Team) (मुंबई पोलिस एसआयटी) तपासात ही बाब समोर आली आहे.

वसुली घोटाळ्याची चौकशी करत आहे SIT

ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसांची एसआयटी वसुली प्रकरणाचा तपास करत आहे. माध्यमाला सांगितल्याप्रमाणे एसआयटीला अद्याप तपासात समीर वानखेडे किंवा एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा सहभाग आढळून आलेला नाही, दरम्यान अजून तपास सुरू आहे.

एनसीबीच्या नावावर वसुलीचा खुलासा

मुंबई पोलिसांच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोच्या (एनसीबी) नावाने काही जणांनी निश्चितपणे वसुली केल्याचे एसआयटीला माहिती मिळली आहे. यामध्ये किरण गोसावी यांचे सर्वात मोठे नाव समोर येत आहे. 

असा होता किरण गोसावीचा प्लान 

किरण गोसावी आणि त्याचे काही साथीदार स्वत:ला एनसीबी अधिकारी असल्याचं सांगत वसुली करायचे. किरण गोसावीने मोठ्या चालाखीने आर्यन खानसोबत सेल्फी घेतला आणि त्यानंतर आर्य़न खानची ऑडिओ क्लिप मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. इतकचं नाही तर जेव्हा आर्यन खानला एनसीबी कार्यालयात आणलं होतं तेव्हा गोसावीला माध्यमांची उपस्थिती माहिती होती. त्या परिस्थितीचा फायदा घेत आर्यन खानचा हात पकडून त्याने एनसीबी कार्यालय गाठलं. जेणेकरून टेलिव्हिजनवर तो एनसीबी अधिकारी असल्याचं भासेल. त्यानंतर लोअर परेल भागात किरण गोसावीने शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिला भेटून तिला पुरावे दाखवले. ज्याच्या आधारे त्यांनी ददलानी असं भासवलं की तो एक अधिकारी आहे तो आर्यन खानला बाहेर काढू शकेल. 


मुंबई पोलीस घेत आहे कायदेशीर सल्ला 

आता या तपासाच्या आधारे मुंबई पोलिसांना किरण गोसावी आणि काही लोकांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक गुन्हा  (प्रिवेंशन ऑफ करप्शनचा)नोंदवायचा आहे, त्यासाठी कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. आतापर्यंत या प्रकरणी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीची जबाब नोंदवण्यात आलेला नाही, कारण तिने प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले आहे. या प्रकरणात अभिनेता चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडेचेही नाव पुढे आले असले तरी सध्या त्याने स्वत:ला कोरोना बाधित असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाची गती मंदावली आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी