Judicial Custody to Aryan till 30 आर्यन खान ३० ऑक्टोबर पर्यंत जेलमध्येच राहणार!

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 21, 2021 | 19:30 IST

ड्रग पार्टी केसमधील आरोपी आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट या दोघांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली. यामुळे आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट ३० ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहे.

Special NDPS Court extends judicial custody of Aryan Khan and others till 30th October
आर्यन खान ३० ऑक्टोबर पर्यंत जेलमध्येच राहणार! 
थोडं पण कामाचं
  • आर्यन खान ३० ऑक्टोबर पर्यंत जेलमध्येच राहणार!
  • ड्रग पार्टी केसमधील आरोपी आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट या दोघांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
  • आर्यनच्या जामीन अर्जावर मुंबईच्या उच्च न्यायालयात मंगळवार २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी

मुंबईः ड्रग पार्टी केसमधील आरोपी आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट या दोघांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली. यामुळे आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट ३० ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहे. आर्यनला जामीन मिळावा यासाठी त्याच्या वकिलाने मुंबईच्या उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर मंगळवार २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. Special NDPS Court extends judicial custody of Aryan Khan and others till 30th October

आर्यनच्यावतीने उच्च न्यायालयात अमित देसाई आणि सतिश मानेशिंदे यांच्यापैकी कोण युक्तीवाद करणार हे अद्याप अनिश्चित आहे. याआधी एनडीपीएस विशेष न्यायालयात (मुंबईचे सत्र न्यायालय, एनडीपीएस विशेष न्यायालय) आर्यनची बाजू अमित देसाईंनी मांडली तर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर त्याची बाजू मानेशिंदेंनी मांडली. आर्यनच्या जामीन अर्जावरील सुनावणी २६ ऑक्टोबरच्या आधी व्हावी यासाठी त्याच्या बाजूने कायदेशीर प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त आहे.

आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमुन धमेचा या आरोपींना २ ऑक्टोबर रोजी एनसीबीने क्रूझवरील ड्रग पार्टीच्या केसमध्ये ताब्यात घेतले आणि ३ ऑक्टोबर रोजी अटक केले. यानंतर आरोपी एनसीबीच्या कोठडीत होते. न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी आर्यन, अरबाझ, मुनमुन या आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. पण निकाल जाहीर होईपर्यंत उशीर झाला होता, त्यामुळे आरोपींना रात्रभर एनसीबीच्या कोठडीत ठेवून ८ ऑक्टोबर रोजी आर्थर रोड जेलमध्ये नेण्यात आले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी