Ajit Pawar: 'म्हणून मंत्रिमंडळाचा अद्याप विस्तार झाला नाही', अजित पवारांची शिंदे-फडणवीसांवर खोचक टीका

मुंबई
रोहित गोळे
Updated Aug 02, 2022 | 17:54 IST

Ajit Pawar Criticism Shinde Govt: राज्यातील नवा सरकारचा अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. याच मुद्द्यावरुन अजित पवारांनी बोचरी टीका केली आहे. पाहा नेमकं काय म्हणाले अजित पवार.

as many mla have been assured that they will minister cabinet has not been expanded yet criticism ajit pawar
'म्हणून मंत्रिमंडळाचा अद्याप विस्तार झाला नाही', खोचक टीका 
थोडं पण कामाचं
  • नव्या सरकारच्या शपथविधीनंतर महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार नाही
  • अजित पवारांची सरकारवर बोचरी टीका
  • अनेक आमदारांना मंत्रिपदाचं आश्वासन दिल्याने झालाय घोळ, अजित पवारांचा दावा

Shinde Cabinet: मुंबई: राज्यात नवं सरकार स्थापन होऊन साधारण एक महिना झाला आहे मात्र, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) होऊ शकलेला नाही. याच मुद्द्यावरुन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार टीका केली आहे. अनेक आमदारांना मंत्रिपदाचं (Minsiter) आश्वासन दिलं असेल पण आता ते पूर्ण होऊ शकत नाही हे लक्षात आल्याने अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अशी टीका अजित पवार यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली आहे. (as many mla have been assured that they will minister cabinet has not been expanded yet criticism ajit pawar)

पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले:

'पूरग्रस्तांची सरकारला चिंता नाही'

'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काही भागात दौरात केला. परंतु त्याच्यानंतर त्यांच्या मीटिंग चालल्या आहेत. अनेक गावांमध्ये अनेक दिवस पाणी होतं. पीकं तर एवढी वाया गेली आहेत की, आताचा घडीला १० लाख हेक्टर क्षेत्र हे पूर परिस्थितीमुळे बाधित झालेलं आहे. पण पूरग्रस्तांची सरकारला चिंता नाही.' अशी टीका अजित पवारांनी केली आहे. 

अधिक वाचा: Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राजकीय भूकंप होणार? अजित पवारांनी थेट आणि स्पष्टच दिलं उत्तर

'बहुतेक त्यांना दिल्लीतून अजून सिग्नल मिळालेला नसेल'

'राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होऊन आता एक महिना उलटला आहे. पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाहीए. कशामध्ये अडकलेलं आहे ते कळायला मार्ग नाही. वास्तविक बहुमत त्यांच्याकडे आहे. मग त्यांना दिल्लीतून सिग्नल मिळत नाही की, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर आमदारांना आम्ही तुम्हाला मंत्री करतो आणि ती संख्या वाढलेली असल्यामुळे सगळ्यांना आता कसं अॅडजस्ट करायचं हा काही प्रश्न निर्माण झालाय का हे देखील कळायला मार्ग नाही.'

'हे सरकार मंत्रिमंडळ विस्तार देखील करत नाहीए आणि आज सर्व खात्यांचा कारभार फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांकडेच आहे. उपमुख्यमंत्र्यांना देखील खाती दिलेली नाहीत. बरेच वर्ष मी प्रशासनात असल्यामुळे मी काही सचिवांना विचारलं की, तुम्हाला कोणत्या खात्याची जबाबदारी दिली आहे का? तर त्यांनी अशी कोणतीही जबाबदारी दिली नसल्याचं म्हटलं आहे.' अशा बोचऱ्या शब्दात अजित पवार यांनी टीका केली आहे. 

'मुख्यमंत्र्यांना सह्या करायला वेळ मिळत नाही'

'यामुळे प्रत्येक फाइल काहीही झालं तरी मुख्यमंत्र्यांकडे जाते. मुळातच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ४२ चं मंत्रिमंडळ अस्तित्वात येऊन देऊन देखील मुख्यमंत्र्यांना खूप जबाबदारी असते आणि कामाचा ताण देखील जास्त असतो. सगळ्या फाइल क्लिअर करण्याकरिता. आज अनेक फाइल रखडलेल्या आहेत. त्यावर सह्या करण्याकरिता मुख्यमंत्र्यांना वेळ नाही.' असं म्हणत अजित पवार यांनी राज्यातील अनेक कामं खोळंबली असल्याचं निदर्शनास आणून दिलं.

अधिक वाचा: Uddhav Thackeray Interview : शिंदे गटाला, एमआयएम किंवा समाजवादी पक्षात विलीन होण्याचा पर्याय; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

'मुख्यमंत्रीचं नियम तोडतात, तर पोलीस आयुक्त काय करणार?'

'मुख्यमंत्र्यांनी काही निर्णय ताबडतोब घेतले पाहिजेत. उपमुख्यमंत्र्यांना अधिकार नसल्याने त्यांच्याकडे कुठली फाईल पाठवायची तो त्याचा प्रश्न आहे. आम्हाला फक्त राज्य सरकारचं काम गतीने झालं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. 
मुख्यमंत्री झाल्यानंतर सत्कार वैगरे यांना दुसरं प्राधान्य असलं पाहिजे. तसंच मुख्यमंत्री असो किंवा कोणीही असो माईक हे १० वाजेनंतर बंद झाले पाहिजेत. तो नियम सगळ्यांना आहे.  आम्ही पण कधी काळी उपमुख्यमंत्री होतो. पण हे काहीही कुणी पाळत नाही. जे राज्याचे प्रमुख आहेत तेच नियम तोडतात तर तिथला पोलीस आयुक्त काय करणार?'

अधिक वाचा: अजित पवार उद्यापासून अतिवृष्टीग्रस्त विदर्भ, मराठवाड्याच्या दौऱ्यावर

'पोलीस आयुक्तांचा आदेश देणारे कायदे मोडायला लागले तर हे बरोबर नाही. हे महाराष्ट्राच्या इतिहासात कोणी पाहिलं नव्हतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीला आवर घातला पाहिजे. त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे.' असा म्हणत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं. 

'कदाचित इतर व्यापामध्ये मुख्यमंत्री अडकले आहेत. परंतु त्याआधी आपण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करता त्यामध्ये खूप मोठी जनता ही अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहे. ते काम करण्याकरिता देखील तुम्ही पालकमंत्री नेमलेले नाही. अशा अनेक प्रकारच्या अडचणी सध्या पाहायला मिळत आहेत.' असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी