मुंबई : कोळशाच्या कमी पुरवठ्यामुळे विजेचं उत्पादन कमी होत आहे. परिणामी नागरिकांना लोडशेडिंगचा सामाना करावा लागत आहे. दरम्यान वीज कमी उत्पादित होत असल्याचा फटका आता नेत्यांना बसला आहे. चालू असलेली मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting)) अर्ध्यातच गुंडळावी लागली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीला राज्याचे सर्व प्रमुख मंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व्हाईस कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला हजर होते. परंतु अचानक मंत्रालयाची लाईट गेली. लाईट गेल्यामुळे मुख्यमंत्र्याचं व्हाईस कॉन्फरन्सिंग कनेक्शन गेलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा संपर्क तुटला. अखेर मुख्यमंत्रीच बैठकीत उपस्थित नसल्याने ही बैठक गुंडाळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर कृषी मंत्री दादा भुसे यांना बैठकीदरम्यान लाईट गेल्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी वीज पुरवठा खंडित झाला नाही. कॅबिनेट संपली होती. त्या व्यतिरिक्त चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री disconnect झाले. कॅबिनेट सुरळीत पार पाडली. त्यानंतर चर्चा होत असताना काही मिनिट मुख्यमंत्र्यांचा संपर्क खंडित झाला होता, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली. तर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आमची अनौपचारिक चर्चा सुरू असताना लाईट गेली, अशी प्रतिक्रिया दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत देखील चर्चा झाली. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेश सरकारला फटकारलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकार आता मार्ग अवलंबणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. याच विषयी आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.