तुकडे- तुकडे गँगची भाषा मुख्यमंत्र्यांच्या तोंडी? - शेलार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 16, 2021 | 14:04 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा हा विचारांची श्रीमंती असलेला होता आणि संध्याकाळी जो झाला तो वातानुकूलित सभागृहातील उसनवारीचा मेळावा होता; असे भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार म्हणाले.

ashish shelar slams uddhav thackeray dussehra rally speech
तुकडे- तुकडे गँगची भाषा मुख्यमंत्र्यांच्या तोंडी? - शेलार 
थोडं पण कामाचं
  • तुकडे- तुकडे गँगची भाषा मुख्यमंत्र्यांच्या तोंडी? - शेलार
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा हा विचारांची श्रीमंती असलेला होता
  • संध्याकाळी जो झाला तो वातानुकूलित सभागृहातील उसनवारीचा मेळावा

मुंबईः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा हा विचारांची श्रीमंती असलेला होता आणि संध्याकाळी जो झाला तो वातानुकूलित सभागृहातील उसनवारीचा मेळावा होता; असे भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार म्हणाले. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशीच भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महान संविधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. संघराज्य पद्धतीवर नखं लावली जात आहेत; असा आरोप शेलार यांनी केला. त्यांनी दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली. ashish shelar slams uddhav thackeray dussehra rally speech

जी भाषा तुकडे तुकडे गँग बोलत होती आज ती भाषा शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या भाषणात झळकते की काय?  हा सवाल आहे. तुकडे तुकडे गँगने काँग्रेसमध्ये प्रवेश करायला सुरुवात केली आणि आता उसनवारी मध्ये तुकडे-तुकडे गँगची भाषा हे बोलायला लागले ? आमची नम्र विनंती आहे. हात जोडून विनंती आहे, भाजपला घालून पाडून बोला, आमच्यावर टीका करा, आम्ही त्याचे उत्तर द्यायला समर्थ  आहोत. पण संविधान आणि संघराज्य पद्धतीला नख लावू नका. याच तुकडे-तुकडे गँगला महाराष्ट्रात रेड कार्पेट तुमच्याच सरकारने घातले होते. म्हणून आम्हाला चिंता वाटते. या तुकडे तुकडे गँगच्या भाषेचा आम्ही त्याचा निषेध आम्ही करतो; असेही शेलार म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी