अस्लम शेख पुरावा द्या अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा!

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 27, 2022 | 00:39 IST

Aslam Shaikh give evidence otherwise face defamation suit says BJP MLA  Ameet Satam : अस्लम शेख पुरावा द्या अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा; असा इशारा भारतीय जनता पार्टीचे आमदार अमीत साटम यांनी दिला आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या हद्दीतील मैदानाला 'टिपू सुलतान' हे नाव देण्यावरून सुरू झालेले राजकारण आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत.

Aslam Shaikh give evidence otherwise face defamation suit says BJP MLA  Ameet Satam
अस्लम शेख पुरावा द्या अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा! 
थोडं पण कामाचं
  • अस्लम शेख पुरावा द्या अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा!
  • भाजपच्या अमीत साटम यांचा इशारा
  • मुंबई महापालिकेच्या हद्दीतील मैदानाला 'टिपू सुलतान' हे नाव देण्यावरून सुरू झालेले राजकारण आणखी तीव्र होण्याची चिन्ह

Aslam Shaikh give evidence otherwise face defamation suit says BJP MLA  Ameet Satam : मुंबई : अस्लम शेख पुरावा द्या अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा; असा इशारा भारतीय जनता पार्टीचे आमदार अमीत साटम यांनी दिला आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या हद्दीतील मैदानाला 'टिपू सुलतान' हे नाव देण्यावरून सुरू झालेले राजकारण आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत.

मुंबई महापालिकेच्या हद्दीतील मैदानाला 'टिपू सुलतान' हे नाव देण्यात येणार असल्याची पोस्टर काही ठिकाणी झळकली. पोस्टरवर 'मुंबई शहर'चे पालकमंत्री अस्लम शेख यांचा फोटो दिसत आहे. यानंतर 'टिपू सुलतान'वरून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भारतीय जनता पार्टी असे चित्र निर्माण झाले.

भारतीय जनता पार्टीने 'टिपू सुलतान' या नावाला जाहीर विरोध केला. विरोधासाठी आंदोलन करत असताना भारतीय जनता पार्टीच्या खासदार, आमदार आणि इतर नेत्यांना पोलिसांनी अटक केली. यानंतर अस्लम शेख यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

'Wazegiri' in BMC : मुंबई महापालिकेत जाधव, चहल, वेलारसु यांची 'वाझेगिरी'; भाजपचा आरोप

भाजपच्या नगरसेवकाने मुंबई महापालिकेत एका रस्त्याला टिपू सुलतान हे नाव देण्यासाठी अनुमोदन दिले असा दावा अस्लम शेख यांनी केला. मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याआधी अमीत साटम यांनीच अनुमोदन दिल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे आमदार अमीत साटम यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

'महापौर किशोरी पेडणेकर आणि 'मुंबई शहर'चे पालकमंत्री अस्लम शेख खोटं बोलत आहेत. मी महापालिकेत नगरसेवक असताना कधीही कोणत्याही रस्त्याला किंवा जागेला 'टिपू सुलतान' हे नाव देण्याचा प्रस्ताव दिलेला नाही. तसेच अशा कोणत्याही प्रस्तावाला कधीही पाठिंबा दिलेला नाही. मी जर 'टिपू सुलतान' हे नाव देण्यासाठी अथवा तशा प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी महापालिकेत कृती केली असेल तर त्याचा पुरावा द्यावा'; अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार अमीत साटम यांनी केली आहे. 'पुरावा द्या नाहीतर मानहानीच्या खटल्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवा'; असा इशारा अमीत साटम यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि 'मुंबई शहर'चे पालकमंत्री अस्लम शेख यांना दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी