Maharashtra Winter Assembly Session : मुंबई : विधानसभा (Assembly) अध्यक्ष निवडणुकीत (Speaker Election) पुन्हा एकदा मोठं विघ्न आलं आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज (Application Form) भरायचा असतानाच राज्य सरकारला (State Government) मोठा धक्का बसला आहे. आवाजी मतदानानं (voice voting) निवडणूक घटनाबाह्य असल्याची भूमिका राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी घेतली आहे. घेतली जाणारी निवडणूक प्रक्रिया ही घटनाबाह्य असल्याचा उल्लेख राज्यपालांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात केला आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियम बदलण्यात आला होता. हा नियम बदलण्यासाठी करण्यात आलेली प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचे राज्यपालांनी राज्य सरकारला कळवले आहे. त्यामुळे त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडी सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
राज्यपालांच्या या निर्णयामुळे आता अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची परिस्थिती दिसत आहे. काल महाविकास आघाडीच्या वतीने मंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांना या निवडणुकीसंदर्भात पत्र सादर करून, परवानगी देण्याची विनंती केली होती. त्यावर आज राज्यपालांकडून सरकारला पत्र पाठवून उत्तर कळवण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यपालांच्या या पत्रानंतर आता महाविकास आघाडी पुन्हा तिसरं पत्र पाठवणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांची दोन शिफारस पत्रे दिली आहेत. तिसऱ्या पत्रात कायदेशीर बाबींवर राज्यपालांकडून शंका उपस्थित केली जात आहे. त्याबाबत पत्रात सविस्तर मुद्दे नमुद केले जातील. विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्याऐवजी खुल्या किंवा आवाजी मतदानाने घेण्याच्या नियमबदलाबाबत कायदेशीर अभिप्राय घेण्याचा निर्णय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल घेतला होता. तर, ही निवडणूक गुप्त मतदानानेच व्हावी, अशी भाजपाची मागणी आहे. आपल्या आमदारांवर महाविकास आघाडी सरकारचा विश्वास नसल्याने हा निर्णय घेतल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. विधानसभा नियमांमध्ये बदल करण्याबाबत बैठक घेण्याचा अधिकार अध्यक्षांनाच असून तो उपाध्यक्षांना नाही. त्यामुळे निवडणूक नियमातील बदल घटनाबाह्य असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केलेले आहे.
दरम्यान राज्याच्या विधीमंडळातील हिवाळी अधिवेशनाचे दोन दिवस उरले आहेत. मात्र विधानसभा अध्यक्ष निवडीचा पेच अद्याप सुटलेला नाही. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपालांना पुन्हा विनंतीपत्र पाठवले जाणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेला मान्यता देण्याबाबत पत्र पाठवले जाणार आहे. महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर पुन्हा पत्र पाठवले जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार पुन्हा राज्यपालांना पत्र पाठवणार आहे. राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती करणारे हे पत्र असणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या नियमात जे बदल करण्यात आले आहेत त्याचा कायदेशीर अभ्यास करत असल्याचे राज्यपालांनी राज्य सरकारला कळवले आहे. राज्यपालांनी हा कायदेशीर सल्ला लवकर घेऊन राज्य सरकारने केलेली विनंती मान्य करावी अशी विनंती करणारे पत्र पुन्हा पाठवले जाणार आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.