Assembly Winter Session : लोकशाहीच्या इतिहासातील हा काळा दिवस; विद्यापीठ सुधारणा विधेयकावरुन देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 29, 2021 | 10:34 IST

University Reforms Bill in Assembly Winter Session : विधीमंडळाच्या (Legislature) हिवाळी अधिवेशनाची (Assembly Winter Session) आज सांगता झाली आहे. मात्र सुरुवातीपासूनच वादळी ठरलेल्या या अधिवेशनाचा शेवटही वादानेच झाला आहे. विद्यापीठ सुधारणा कायद्यावरून (University Reforms Bill) विधानसभेचे विरोधी पक्षनेते (Leader of the Opposition in the Legislative Assembly) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर (State Government) जोरदार हल्लाबोल केला.

University Reforms Bill in Assembly Winter Session
विद्यापीठ सुधारणा विधेयकावरुन फडणवीस ठाकरे सरकारवर बरसले  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 'महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घाबरट सरकार'
  • सरकारकडून विद्यापीठावर कब्जा करण्याचा प्रयत्न आहे. या विधेयकाच्या माध्यमातून विद्यापीठाच्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न - फडणवीस
  • राज्यपालांचे अधिकार कमी करणारे विद्यापीठ सुधारणा विधेयक गोंधळात मंजूर

University Reforms Bill in Assembly Winter Session : मुंबई : विधीमंडळाच्या (Legislature) हिवाळी अधिवेशनाची (Assembly Winter Session) आज सांगता झाली आहे. मात्र सुरुवातीपासूनच वादळी ठरलेल्या या अधिवेशनाचा शेवटही वादानेच झाला आहे. विद्यापीठ सुधारणा कायद्यावरून (University Reforms Bill) विधानसभेचे विरोधी पक्षनेते (Leader of the Opposition in the Legislative Assembly) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर (State Government) जोरदार हल्लाबोल केला. हे विधेयक कोणत्याही चर्चेविना गोंधळात मंजूर करण्यात आलं असून हे सरकार पळकुटं आणि भित्र आहे, आजचा दिवस हा राज्याच्या लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. 

सरकारने आणलेल्या नव्या विद्यापीठ कायद्यावरून फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. हे विद्यापीठ सुधारणा विधेयक सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड गोंधळाच्या वातावरणात मंजूर करण्यात आले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'आम्ही अतिशय महत्त्वाचे आक्षेप या कायद्याविषयी मांडले होते. राज्य सरकारला या कायद्याद्वारे विद्यापीठांना नवीन शासकीय महामंडळ बनवायचं आहे. आतापर्यंतच्या कोणत्याही कायद्यात मंत्र्यांना विद्यापीठांच्या प्रशासकीय कामकाजात ढवढावळ करू देणारी तरतूद नव्हती. "2016 सालच्या कायद्याने विद्यापीठं राजकारणापासून दूर ठेवले होते. आता हे चर्चा न करता विधेयक मंजूर करुन घेण्याचे पाप या सरकारने केले आहे. विधानमंडळातील सचिवालयही यामध्ये सामिल आहे. हे सरकार पळकुटं आणि भित्रं आहे. आजचा दिवस हा राज्याच्या इतिहासातील काळा दिवस आहे." 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांना प्र-कुलपती होण्याची काय हौस आहे कळत नाही. प्र-कुलपती होऊन विद्यापीठाच्या प्रशासकीय कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न आहे. या निमित्ताने सरकारकडून विद्यापीठावर कब्जा करण्याचा प्रयत्न आहे. या विधेयकाच्या माध्यमातून विद्यापीठाच्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यापीठं आता सरकारच्या हातचं बाहुलं बनणार आहेत."

आशिष शेलार यांनी केलेल्या आरोपाचा उल्लेख 

राज्य सरकारवर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या आरोपाचा उल्लेख केला आहे. 'आमचे आमदार आशिष शेलार यांनी आरोप केला होता की यांना विद्यापीठाच्या जमिनी बळकावयाच्या आहेत. आता आजच्या कायद्यानंतर आम्हालाही त्या आरोपात सत्यता वाटायला लागली आहे.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत राज्यपालांचे अधिकार कमी करणारे विद्यापीठ सुधारणा विधेयक अखेर गोंधळात मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकावरुन सरकार आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. राज्य सरकारच्या या विधेयकामुळे आता राज्यपालांचे अधिकार कमी होणार असून राज्यातील विद्यापीठांवर अंकुश ठेवण्यासाठी प्र-कुलपतीपद निर्माण करण्यात येणार आहे. या प्र-कुलपतीपदी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असणार आहेत. त्यामुळे विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती आता थेट राज्यपाल करू शकणार नाहीत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी