बसं झालं..., उद्धव ठाकरेंचा संयम सुटला, भायखळ्यातील जखमी शिवसैनिकांची विचारपूस

भायखळा येथील दोन शिवसैनिकांवर हल्ला झाला. या जखमी शिवसैनिकांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर हल्ला चढवला.

'Attack on Shiv Sainiks cannot be tolerated, if police cannot punish then...', said Uddhav Thackeray in Mumbai
बसं झालं..., उद्धव ठाकरेंचा संयम सुटला, भायखळ्यातील शिवसेना शाखेस भेट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गुरुवारी शिवसैनिकांवर हल्ला
  • उद्धव ठाकरे यांनी जखमी शिवसैनिकांची भेट घेतली
  • उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांना इशारा दिला

मुंबई : शिवसेनेतील नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणाचा फटका आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बसू लागला आहे. भायखळा येथील दोन शिवसैनिकांवर गुरुवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला. सुदैवानं या हल्ल्यातून शिवसैनिक थोडक्यात बचावले. दरम्यान, आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जखमी शिवसैनिक बबन गावकर आणि विजय कामतेकर यांची भेट घेऊन त्यांना आधार दिला. तसेच 'शिवसैनिकांवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा संबंधितांना ठाकरे यांनी दिला. ( 'Attack on Shiv Sainiks cannot be tolerated, if police cannot punish then...', said Uddhav Thackeray in Mumbai)

अधिक वाचा : Sharad Pawar: 'शिंदे-फडणवीसांची राज्य चालवण्याची कुवत काय आहे हे राऊतांना माहिती आहे', नागपुरातून पवारांचा खोचक पुणेरी टोला

शिवसेनेचे भायखळा विधानसभा समन्वयक बबन गावकर आणि उपविभाग प्रमुख विजय कामतेकर स्वीफ्ट कारमधून घरी निघाले होते. त्यावेळी माझगाव येथे दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी कामतेकर यांच्या कारवर तलवारीने हल्ला केले. या हल्ल्यात कामतेकर व गावकर हे हल्ल्यातून थोडक्यात बचावले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भायखळ्यामधील जखमी शिवसैनिकांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर शिवसेना २०८ नंबरच्या शाखेला भेट देऊन शिवसैनिकांशी संवाद साधला, त्यांना आधार दिला.

शिवसेनेत आमदारांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशी दोन गटात शिवसेनेची फूट पडल्याचा फटका कार्यकर्त्यांनाही बसला. आता दोन्ही गटांचे कार्यकर्ते आपापसात भांडत आहेत. गेल्या महिन्यात, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील अनेक आमदारांनी बंड केले, त्यानंतर ते सुरत, गुवाहाटी आणि नंतर गोव्याला गेले. एकनाथ शिंदे यांनी नंतर भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसही उपमुख्यमंत्री झाले.

अधिक वाचा : इंजिनिअर व्हायचं स्वप्न झालं पुर्ण पण...., 8 व्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी सुसाईट नोटमध्ये लिहलं कारण

दक्षिण मुंबईतील भायखळा विधानसभेच्या आमदार यामिनी जाधव  आहेत, त्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपैकी एक आहेत आणि आता त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्या आहेत. पीडित कार्यकर्त्याची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, "शिवसेना कार्यकर्त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. जर पोलिस दोषींना शिक्षा करू शकत नसतील तर शिवसेना कार्यकर्ते तसे करतील. पोलिसांनी राजकारणात येऊ नये, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी