Devendra Fadnavis : मुंबई : भोंगा वादाच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे सरकारने (Thackeray government) धार्मिक स्थळांवरील (religious places) लाऊडस्पीकरबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यासाठी सर्व पक्षांची बैठक बोलावली. या बैठकीला जवळपास सर्वच पक्षांनी उपस्थित राहण्यास संमती दिली असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (President Raj Thackeray) या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. तसेच आता भाजपाचे (BJP) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील बैठकीस उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. दरम्यान भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी किरीट सोमय्यांवर हल्ला, राणा दाम्पत्य तसेच इतर राजकीय घडामोडींवर ठाकरे सरकारचा समाचार घेतला आहे. दरम्यान, राज्यातील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला जाणं भाजपच्या नेत्यांनी टाळलं आहे. भोंगा वादाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी आम्हाला बैठकीचं निमंत्रण दिलं होतं, पण हिलटरलशाहीमुळे आम्ही या बैठकीवर बहिष्कार घातला आहे. गृहमंत्र्यांना काही अधिकार तरी आहेत का? महाराष्ट्रात जे काही चाललंय ते मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावर चाललंय, मुंबईतील घटना मुख्यमंत्री कार्यालयाच्या इशाऱ्यानं चालल्या आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रातील घटना गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानं चालल्या आहेत, सरकारने संवादासाठी जागा ठेवली नाही एवढ्या महत्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री नाहीत मग ही बैठक टाईमपास आहे का? अश्या गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन फायदा काय? असे फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.
कोणी जर हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं ठरवलं असेल तर त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेलाच बरा, अशी आमची मानसिकता झाल्याने आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकला असल्याचं फडणवीस म्हणाले. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते पोलीस संरक्षणात आमच्या नेत्यांवर हल्ले करत असतील आणि त्यानंतरही एफआयआर दाखल करण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत असेल तर अशा बैठकींना जाऊन फायदा काय?' असं म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.
महाराष्ट्रातलं पुरोगामित्व संपलं, ठाकरे सरकारने विरोधी पक्षाला जिवानिशी संपवायचं ठरवलंय. जिथे गुन्हा नोंद करायला ही संघर्ष करावा लागत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात अशी परिस्थिती पाहिली नव्हती. त्यांना लोकशाही मान्य नाही, त्यांनी आमच्या पोलखोल सभांवर हल्ला केला, असे हल्ले करून आम्ही घाबरणार नाही हे लक्षात ठेवावं. कायदा सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे, सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाचे पालन झालेच पाहिजे, झेड सेक्युरिटीमध्ये आमच्या नेत्यांना मारण्याचा प्रयत्न झालाय, म्हणजेच पोलीस संरक्षणात देखील भाजप नेत्यावर हल्ला करण्यात आल्याचा थेट आरोप फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.