मुंबई : मुंबईतील मंत्रालयासमोर (Mantralaya) एका व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा प्रयत्न (man attempt self immolation) केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ज्या व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न करणारा व्यक्ती हिंगोली जिल्ह्यातील असून त्याचे नाव राजू चन्नाप्पा हुलगुंडे असं आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजू चन्नाप्पा हुलगुंडे हे गेल्या 8 महिन्यांपासून उपोषण करत होते. सार्वजनिक बांधकाम विभागावर त्यांचा आक्षेप होता. बांधकाम विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आज दुपारच्या सुमारास त्यांनी अंगावर रॉकेल ओतून मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आणि राजू चन्नाप्पा हुलगुंडे यांना ताब्यात घेतलं आहे. वेळीच पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत राजू चन्नाप्पा हुलगुंडे यांना रोखले आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या माळवट येथे राजू चन्नाप्पा हुलगुंडे हे राहतात. ताडकळस ते पालम या रस्त्याच्या थकीत कामाचे पैसे मिळण्यासाठी ते वारंवार चकरा मारत होते. 25 ऑक्टोबर 2021 पासून ते यासाठी तासतत्याने पाठपुरवठा करत होते. मात्र, पैसे न मिळाल्याने ते नैराश्येत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू चन्नाप्पा हुलगुंडे यांच्या कामाची थकीत रक्कम ही एक कोटींच्या घरात होती मात्र, त्यांना केवळ 14 लाख रुपयेच मिळाले होते. इतकंच नाही तर आंदोलन करत असल्याने आपल्याला धमकावलं आणि मारहाण केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राजू चन्नाप्पा हुलगुंडे यांनी बांधकाम विभागावर आरोप केले आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.