मुंबई: जुईनगर स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाशी ते पनवेल दरम्यान ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र आता बिघाड दुरुस्त झाला आहे. मात्र तरिही हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीतच आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने पहाटे पहाटेच चाकरमान्यांना त्याचा फटका बसला आहे. दरम्यान, रेल्वेकडून हार्बरवरील वाहतूकसेवा पूर्ववत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर ही वाहतूक सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. (Attention please! local services start at slow speed; Harbor traffic slowly back to normal)
हार्बर मार्गावरील बिघाडाची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ दखल घेत बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र तरिही हार्बर मार्गावरील वाहतूक अद्याप उशिरानंच सुरू आहे.विस्कळीत असलेली उपनगरीय रेल्वेसेवा पूर्वपदावर येण्यास उशीर होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बिघाड दुरूस्त होऊनही उपनगरीय रेल्वेसेवा 20 ते 25 मिनिटं उशिरानं सुरू आहे.
अधिक वाचा : समृद्धी महामार्गावर 'लालपरी' धावणार; जाणून घ्या बस भाडे किती
तब्बल एक तास हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प होती. लोकल सेवा विस्कळीत झाल्यानं सकाळी कामावर जाण्याच्या गडबडीत असणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फटका बसणार आहे. रेल्वे वाहतूक बंद झाली त्यावेळी रेल्वे विभागाकडून कोणतीच सूचना देण्यात येत नव्हती. वाहतूक कोणत्या कारणाने बंद झाली, वाहतूक कधी सुरू होणार याबाबतची कोणतीही माहिती रेल्वेकडून देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे चाकरमानी चांगलेच वैतागले होते.
अधिक वाचा : भारतीय सैन्याने चिनी सैन्याला बदडले अन् पळवून लावले, VIDEO
ऐन सकाळी हार्बर रेल्वे वाहतूक मार्गावरील जुईनगर स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे वाशी ते पनवेल मार्गावरील लोकलसेवा ठप्प झाली होती. या तांत्रिक बिघाडामुळं हार्बर रेल्वेचं वाहतूक वेळापत्रक मागे पडले आहे. हार्बर रेल्वेवरुन धावणाऱ्या काही गाड्या उशिराने धावत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.