अविनाश भोसले ३० मे पर्यंत नजरकैदेत

मुंबई
रोहन जुवेकर
Updated May 28, 2022 | 08:04 IST

avinash bhosale under house arrest till 30 may 2022, cbi sp. court order : पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांना ३० मे २०२२ पर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिले

avinash bhosale under house arrest till 30 may 2022, cbi sp. court order
अविनाश भोसले ३० मे पर्यंत नजरकैदेत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • अविनाश भोसले ३० मे पर्यंत नजरकैदेत
  • मुंबईच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा आदेश
  • वरळीच्या घरात अविनाश भोसले नजरकैदेत, सीबीआय चौकशी करणार

avinash bhosale under house arrest till 30 may 2022, cbi sp. court order : मुंबई : पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांना ३० मे २०२२ पर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत. यस बँक आणि डीएचएफएल यांच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात सीबीआय अविनाश भोसले यांचा शोध घेत होती. अखेर अविनाश भोसले यांना गुरुवार २६ मे २०२२ रोजी सीबीआयने पुण्यात पकडले आणि शुक्रवार २७ मे २०२२ रोजी मुंबईत सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले. 

ईडीची मोठी कारवाई, पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले कुटुंबाची ४० कोटींची संपत्ती जप्त

मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने अविनाश भोसले यांना ३० मे २०२२ पर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अविनाश भोसले यांचे मुंबईत वरळी येथे एक घर आहे. याच घरात अविनाश भोसले यांना ३० मे २०२२ पर्यंत नजरकैदेत ठेवण्यात येईल. सीबीआय अविनाश भोसले यांना ३० मे २०२२ रोजी पुन्हा मुंबईच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करणार आहे. नजरकैदेत असताना अविनाश भोसले यांना वकिलाला तसेच घरातील एका सदस्याला भेटण्याची परवानगी आहे. सीबीआय अविनाश भोसले यांची नजरकैदेत असताना चौकशी करू शकणार आहे. 

व्यावसायिक असलेल्या अविनाश भोसले यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे ते सासरे आहेत. मात्र भोसले यांचा सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांसोबत संपर्क आहे. 

सीबीआयने यस बँक आणि डीएचएफएल प्रकरणात अविनाश भोसले, शाहीद बलवा आणि विनोद गोयंका यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाड टाकली. अनेक कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. याआधी ईडीने जून २०२१ मध्ये अविनाश भोसले यांची ४० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी