BMC on Omicron : मुंबई : गेल्या काही दिवसांत मुंबईत ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी ख्रिसमस आणि न्यु इयर पार्टीला जाणे टाळावे असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. तसेच पालिका वॉर्ड निहाय टीम बनवणार आहेत. लग्न समारंभात गर्दी टाळण्यासाठी या टीम लक्ष ठेवून असतील. तसेच घरात होणार्या पार्ट्यांवरही पालिकेचे लक्ष असणार आहे. (avoid gathering in Christmas and new year eve bmc appeal citizen over omicron variant )
ख्रिसमस आणि न्यु इयरच्या पार्श्वभुमीवर अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन होईल. अशा वेळी नागरिकांनी जागृक होऊ नियमांचे पालन करावे. त्यांच्या पार्ट्यांवर पालिका पाळत ठेवणार नाही. पण जिथे गर्दी होईल अशा ठिकाणी आमचे लक्ष असेल असे महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले आहेत.
सध्या जगभरात ओमिक्रॉनचे संकट वाढत असून काही देशांनी पुन्हा लॉकडाऊन लावला आहे. भारतात ती वेळ येऊ नये म्हणून शासन प्रयत्नशील आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घ्यावे तसेच हॉटेल्स, लग्नाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचे नियम पाळावे असे आवाहन पालिकेने केले आहे.
जगभरात अनेक ठिकाणी ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले आहेत. भारतात कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सरकार आणि शासन प्रयत्न करत आहे. परंतु नागरिक अजूनही निष्काळजी दाखवत असल्याचे पालिकेने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असेही पालिकेने आवाहन केले आहे.
मुंबईत लग्नाचे हॉल ५० टक्के क्षमतेने लॉन्समध्ये २५ टक्के क्षमतने सुरू झाले आहेत. लग्न समारंभात एक हजारपेक्षा पाहुणे येणार असतील तर तशी परवानगी घ्यावी लागेल. सध्या मुंबईत रेस्टॉरंट्स, बार आणि नाईटक्लब रात्री साडे बारापर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू आहे.
शुक्रवारी मुंबईत ओमिक्रॉनचे १४ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. ओमिक्रॉनचे संकट पाहता मुंबईत ३१ डिसेंबपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.