Raut on Ayodhya Verdict : राऊतांनी अयोध्या निकालापूर्वी दिले मोठे वक्तव्य 

मुंबई
Updated Nov 09, 2019 | 11:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

शिवसेनचे खासदार संजय राऊत यांनी आजही आपली पत्रकार परिषद मिस केली नाही. आजचा दिवस हा राजकीय नाही. अयोध्या वादावर निकाल येण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते.

 Ayodhya Verdict sanjay raut shiv sena bjp political news in marathi google newsstand
राऊतांनी अयोध्या निकालापूर्वी दिले मोठे वक्तव्य   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई :  शिवसेनचे खासदार संजय राऊत यांनी आजही आपली पत्रकार परिषद मिस केली नाही. आजचा दिवस हा राजकीय नाही. अयोध्या वादावर निकाल येण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. ते म्हणाले, राम मंदिर प्रकरमी निकाल सर्वोच्च न्यायालयाचा असणार आहे. सरकारचा नव्हे, असा टोला  संजय राऊत यांनी भाजपला आणि केंद्र सरकारला दिला आहे. 

सर्वोच्च न्यायालय आज गोड बातमी देणार आहे. या निकाल कोर्टाचा असेल सरकारचा नाही, अयोध्येतील आंदोलनात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. शिवसैनिकांनी त्यावेळी बलिदान केले आहे. बाबरी मशीद पाडल्यावर हे काम शिवसैनिकांनी केले असेल तर त्याचा मला गर्व आहे, असे एकाच वाघाने सांगितले ते शिवसेना प्रमुखम बाळासाहेब ठाकरे होते. राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेने जिवंत ठेवला आहे. अयोध्येत राम मंदिर होणार असे सांगत काही जणांनी पळ काढला. मात्र, शिवसेना ठाम राहिली असे राऊत यांनी सांगितले. 

राजकारणासाठीच राम मंदिर हा विषय आमच्यासाठी नाही आणि नव्हता. आम्ही हा विषय जीवंत ठेवला शिवसेना पक्ष प्रममुख उद्धव ठाकरे दोन वेळा अयोध्येत जाऊन आले आहेत. कोणीही याचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न करू नयेत. योगदान सर्वांचे आहेत. हा निर्णय भावनांच्या आदर करणारा असेल, तेथे राम मंदिर बनणार आहे. १९९१ ची परिस्थिती निर्माण होणार नाही. आज गोड बातमी येईल, पण राजकीय नाही असा टोलाही त्यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...