बच्चू कडू-रवी राणा वाद मिटला? तब्बल अडीच तास बैठकीनंतर राणा म्हणाले हम साथ साथ है,हम दोस्त है'

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 31, 2022 | 07:34 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादावर समोपचाराने तोडगा काढत पूर्णविराम देण्यात आला असल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, वर्षावर तब्बल अडीच तास बैठक झाली, मात्र काय निर्णय झाला? याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास सर्व नेत्यांनी नकार दिल्याचे समजते.

Bachu Kadu-Ravi Rana controversy
बच्चू कडू-रवी राणांना युती धर्माची करून देण्यात आली आठवण  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • सरकारवर नाराजी नाही. रवी राणा यांच्यामुळे वाद झालाय.
  • मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कडू आणि राणा वादावर दोन तास चर्चा.
  • बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या जाहीर आरोप प्रत्यारोपांमुळे युतीचे वातावरण दुषित होत होतं.

मुंबई :  माजी राज्यमंत्री (Former Minister of State) आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu)आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे राज्यातील सरकारमध्ये कडू वातावरण तयार झाले होते. दोन्ही नेत्यांमध्ये वाढत जाणारा वाद पाहून मुख्यमंत्री (Chief Minister) आणि उपमुख्यमंत्र्यांनी Deputy (Chief Minister) मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रवी राणा यांना रविवारी मुंबईला आपल्या 'वर्षा' निवासस्थानी बोलावले होते. मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कडू आणि राणा वादावर दोन तास चर्चा करण्यात आली. या चर्चेत वादाला पूर्णविराम देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Bachu Kadu-Ravi Rana controversy : After meeting for two and a half hours, Rana said Hum Saath Saath Hai, Hum Dost Hai)

अधिक वाचा  :गुजरातमधील भीषण दुर्घटनेचा पाहा व्हिडिओ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादावर समोपचाराने तोडगा काढत पूर्णविराम देण्यात आला असल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, वर्षावर तब्बल अडीच तास बैठक झाली, मात्र काय निर्णय झाला? याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास सर्व नेत्यांनी नकार दिल्याचे समजते. आज दोन्ही नेते आपापली भूमिका मांडणार आहेत. बैठकीत काय झालं हे सांगण्यासाठी दोन्ही नेत्यांनी थेट माध्यमांसमोर येण्याचं टाळलं. दरम्यान रवी राणा यांनी दूरध्वनीवरून हम साथ, साथ है या हिंदी चित्रपटाचे नाव घेत वाद मिटल्याचे संकेत  दिले.

अधिक वाचा  : या प्रसिद्ध उद्यानाखाली पुरलेले आहेत 20 हजार मृतदेह

दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अमरावती जिल्ह्यातील दोन्ही नेत्यांना योग्य समज देऊन युती धर्माचे पालन करण्यास सांगण्यात आले. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या जाहीर आरोप प्रत्यारोपांमुळे युतीचे वातावरण दुषित होत होतं. दरम्यान अद्याप दोन्ही नेत्यांना थेट आपली प्रतिक्रिया मांडण्यास नकार देण्यात आला आहे. एकमेकांविरुद्ध जाहीर वाच्यता न करता शिंदे आणि फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढावा, असं या चर्चेत ठरलं आहे. वर्षा बंगल्यावर तब्बल अडीच तास झालेल्या या मॅरेथॉन चर्चेत तोडगा निघाल्याचे म्हटलं जात आहे. आज हा या दोन्ही नेत्यांकडून वाद मिटल्याचं जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू हे दोन्ही नेते आज सकाळी 9 वाजता 'सागर' बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून वाद मिटल्याच्या संदर्भात पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  :   घरी कांदे पोहेचा कार्यक्रम आहे; मग करा ही चार कामे
या बैठकीनंतर बच्चू कडू आणि रवी राणा यांनीही थोडक्यात प्रतिक्रिया दिली आहे. समोरासमोर चर्चा झाली नसल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. तर, या बैठकीत चर्चा सकारात्मक झाली असून 'हम साथ साथ है, हम दोस्त है' अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दूरध्वनीवरून दिली. मात्र माध्यमांसमोर बोलण्यास उपमुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार रवी राणा यांनी टाळलं.

रवी राणा आणि बच्चू कडूंचा वाद काय? 

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात सध्या मोठा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर घणाघाती आरोप केले. गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडूंवर केला होता. यानंतर दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिकाच सुरू झाली.

मुख्यमंत्र्यांकडून मध्यस्थी

रवी राणा यांनी बच्चू कडू यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. यानंतर दोन्ही नेत्यांमधील या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचे ठरवले होते. त्यासाठी या दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी बोलावण्यात आले होते. 

तर एक नोव्हेंबरला आंदोलन करणार - कडू

बैठकीला जाण्यापूर्वी बच्चू कडू म्हणाले होते, सरकार वर नाराजी नाही. रवी राणा यांच्यामुळे वाद झालाय. रवी राणा यांनी माफी मागितली पाहिजे. या बदनामीनंतर समाधानकारक तोडगा निघाला पाहिजे. अन्यथा एक तारखेच्या आंदोलनावर ठाम राहायचे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.  ही सर्व 50 आमदारांची बदनामी केली आहे. यावर समाधानकारक तोडगा नाही निघाला तर एक तारखेला आंदोलन करणार असे कडू यांनी म्हटले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी