उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बाळासाहेबांचा सर्वात जवळचा माणूस शिंदे गटात

Champasingh Thapa : बाळासाहेब ठाकरेंचे (Bal Thackeray) सहाय्यक आणि सर्वात विश्वासू चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत थापांनी शिंदे गटात प्रवेश केला.

Breaking News
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बाळासाहेबांचा सर्वात जवळचा माणूस शिंदे गटात  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • बाळासाहेब ठाकरेंचे (Bal Thackeray) सहाय्यक आणि सर्वात विश्वासू चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
  • त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत थापांनी शिंदे गटात प्रवेश केला.
  • एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर अनेक आमदार, कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील झाले होते.

मुंबई  : बाळासाहेब ठाकरेंचे (Bal Thackeray) सहाय्यक आणि सर्वात विश्वासू चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत थापांनी शिंदे गटात प्रवेश केला. (Bal Thackeray's former PA Champa Singh Thapa joined Shinde Camp today)

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर अनेक आमदार, कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील झाले होते. गळती अद्याप सुरूच आहे. आता बाळासाहेबांचे सहाय्यक चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.

अधिक वाचा : गाढवाच्या गळ्यात अडकवला आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा फोटो

 Champasingh thapa

चंपासिंग थापा यांच्या सोबतच बाळासाहेब ठाकरेंचे आणखी एक निकटवर्तीय मोरेश्वर राजे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान मुख्यमंत्री म्हणाले,  तुम्ही बाळासाहेबांचे विचार घेवून पुढे जात आहात, म्हणून थापा माझ्यासोबत आलेत. 

माहितीनुसार, चंपासिंग थापा 30 वर्षांपूर्वी नेपाळहून भारतात आले. सुरुवातीच्या काळात मुंबईच्या गोरेगावमध्ये राहून पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी छोटी-मोठी कामं केली. 

अधिक वाचा : 

भांडूपचे नगरसेवक के.टी.थापा यांच्या ओळखीने चंपासिंग थापा यांना मातोश्रीवर प्रवेश मिळाला. त्यानंतर पुढील काही काळातच थापा बाळासाहेबांचे लाडके झाले.
अधिक वाचा :  भरधाव डंपरची अनेक गाड्यांना धडक, वाशीमधील घटनेचा LIVE VIDEO


थापा बाळासाहेब ठाकरेंचं जेवण, औषधांच्या वेळा यासारख्या रोजच्या गोष्टींवर लक्ष ठेवत. मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर थापांनी बाळासाहेबांची जीवापाड काळजी घेतली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी