Balasaheb Thackeray: 'ज्यांनी-ज्यांनी शिवसेना सोडलीय त्यांना बाळासाहेबांची हाय लागलीय', कोणी केली टीका?

मुंबई
रोहित गोळे
Updated Aug 07, 2022 | 16:13 IST

Sunil Raut Criticized 40 Rebel mla: शिवसेना नेते संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांवर अत्यंत जहरी टीका केली आहे.

balasaheb thackeray sanjay raut brother mla sunil raut venomous criticism of shiv sena 40 rebel mla
Balasaheb Thackeray: 'ज्यांनी-ज्यांनी शिवसेना सोडलीय त्यांना बाळासाहेबांची हाय लागलीय', कोणी केली टीका?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ४० बंडखोर आमदारांवर संजय राऊतांच्या भावाची जहरी टीका
  • ४० आमदारांना बाळासाहेबांची हाय लागेल, सुनील राऊत संतापले
  • सुनील राऊतांची भाजपवर देखील टीका

Sanjay Raut Brother: मुंबई: 'ज्यांनी-ज्यांनी शिवसेना (Shiv Sena) हा पक्ष सोडला त्या प्रत्येकाला बाळासाहेबांची हाय लागलीय हा इतिहास आहे.' अशी अत्यंत जहरी टीका शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनी केली आहे. संजय राऊत यांची ईडी कोठडी (Ed Custody) उद्या संपणार आहे त्याआधी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याचवेळी सुनील राऊत यांची त्यांच्याशी भेट झाली. या भेटीनंतर सुनील राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. हा संवाद साधताना त्यांनी ४० बंडखोर आमदारांवर जहरी टीका केली आहे. (balasaheb thackeray sanjay raut brother mla sunil raut venomous criticism of shiv sena 40 rebel mla)

संजय राऊत हे गेल्या दोन अडीच वर्षापासून भाजपशी लढत आहेत. त्यामुळेच भाजपने खोट्या प्रकरणांमध्ये राऊत साहेबांना अडकवलं आहे. असा आरोप सुनील राऊतांनी केला आहे. यावेळी ४० बंडखोर आमदारांवर देखील त्यांनी तुफान टीका केली. 

पाहा सुनील राऊत नेमकं काय-काय म्हणाले.  

'उद्धव साहेबांनी कुठे यांना बाहेर फेकलं होतं. शिवसेना पक्ष सोडून कोण गेलं आहे? त्यांना बोलवायची गरज नाही. त्यांना पश्चाताप झाला असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क करावा. हे बघा.. दीपक केसरकरांचा मागचा इतिहास पाहा.. केसरकरांना कुठून एनर्जी आली तेच कळत नाही. यापूर्वी त्यांच्या चालण्या-बोलण्यात कधीही तत्परता आज अचानक कशी तत्परता आली?' असा सवाल विचारात सुनील राऊतांनी केसरकरांवर टीका केली.  

'ही सुरुवात आहे आता पाहा निकाल काय येतो दिल्लीवरुन ते पाहा. आपल्यालाही माहिती आहे की, या देशातील सर्व कायदेतज्ज्ञ यांचं एकच म्हणणं आहे की, एक तर हे अपात्र ठरतील किंवा यांना दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात विलीन व्हावं लागेल. पाहू किती जण विलीन होतायेत. कळेल ते पण.' 

'एक लक्षात ठेवा हा पक्ष शेवटी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे. या बाळासाहेबांनी हा पक्ष कसा बांधला किती कष्ट करुन बांधला. शेवटी ज्यांनी-ज्यांनी हा पक्ष सोडला त्या प्रत्येकाला बाळासाहेबांची हाय लागलीय हा इतिहास आहे.' अशी जहरी टीका सुनील राऊत यांनी यावेळी केली आहे. 

'आज तुम्ही पाहाल तर अख्ख्या महाराष्ट्रात जो महिला वर्ग त्यांच्या डोळ्यात अश्रू होते जेव्हा उद्धवसाहेबांनी वर्षा सोडलं. हे अश्रू म्हणजे काय.. तर हे अश्रू त्या ४० जणांना लागलेले तळतळाट आणि हाय आहे.' अशा शब्दात सुनील राऊतांनी संताप व्यक्त केला.  

'संजय राऊत हे बाळासाहेबांचे निष्ठावान सैनिक आहेत. जे बाळासाहेबांना अपेक्षित आहे तेच संजय राऊत करत आले आहेत. तर आपण अजिबात चिंता करु नका की, संजय राऊतांनी काही भ्रष्टाचार केला असेल. संजय राऊत भ्रष्टाचार करुच शकत नाही. पण हे सगळं फ्रेम केलं जात आहे.' 

'संजय राऊत यांनी गेल्या दोन अडीच वर्षापासून भाजपविरोधात मोहीम सुरु केली आहे. त्यामुळे भाजप संजय राऊतांना घाबरत आहे म्हणून त्यांना ते ईडीमध्ये अडकवत आहेत.' असा आरोप सुनील राऊत यांनी  भाजपवर केला. 

'कितीही आमच्यावर किंवा आमच्या कुटुंबीयांवर अन्याय होवो आम्ही शिवसेना सोडणार नाही. आम्ही उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेबांना पाहतो. आम्ही त्यांना सोडणार नाही. भले काहीही होवो.' असंही सुनील राऊत ठामपणे यावेळी म्हणाले.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी