CM Eknath Shinde : भाजपसोबत युती झालेली पाहून बाळासाहेबांना आनंद झाला असता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेना फोडून बंडखोरांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली हे पाहून बाळाहेसाबांच्या आत्म्याला क्लेश पोहोचले असतील अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. त्यावर भाजपसोबत युती झालेली पाहून बाळासाहेबांना आनंद झाला असता अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

cm ekanathi shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेना फोडून बंडखोरांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली हे पाहून बाळाहेसाबांच्या आत्म्याला क्लेश पोहोचले असतील अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.
  • त्यावर भाजपसोबत युती झालेली पाहून बाळासाहेबांना आनंद झाला असता अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
  • आम्ही बाळासाहेबांच्या विचारानुसार चालत आहोत असेही शिंदे म्हणाले.

CM Eknath Shinde : मुंबई : शिवसेना (Shivsena) फोडून बंडखोरांनी भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली हे पाहून बाळाहेसाब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या आत्म्याला क्लेश पोहोचले असतील अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी केली. त्यावर भाजपसोबत युती झालेली पाहून बाळासाहेबांना आनंद झाला असता अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. (Balasaheb Thackeray would happy with alliance bjp says cm eknath shinde)

अधिक वाचा : Sanjay Raut : ज्यांनी पुरावे दाखवायला लावले त्यांना ही पापं फेडावी लागतील, शिवसेना खासदार संजय राऊत यांची टीका

आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमची युती होती. आम्ही युतीत असताना निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या. परंतु निवडणुकीनंतर आम्ही भाजपशी युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. ही बाब आम्हाला खटकली म्हणून आम्ही बाहेर पडलो आणि भाजपशी युती केली. बाळासाहे असते तर त्यांना आनंदच झाला असता. भाजपची शिवसेनेची २५ हून अधिक वर्ष युती आहे. बाळासाहे ठाकरे म्हणाले होते की काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली तर मी माझा पक्ष बंद करेन. आम्ही बाळासाहेबांच्या विचारानुसार चालत आहोत असेही शिंदे म्हणाले.

अधिक वाचा : Aaditya Thackeray: 'मातोश्रीचे दरवाजे कधीच कोणासाठी बंद नाही' ठाकरेंची शिंदे गटासोबत चर्चेची तयारी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी