शिवसेना कोणाची? वाद सुरू असतानाच बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनेने घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 28, 2022 | 09:15 IST

महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकीय पेचप्रसंगानंतर (political crisis)नवे सरकार (government) स्थापन झाले असले तरी सत्तासंघर्ष सुरूच आहे. आता पक्षप्रमुख (Party chief ) पद आणि शिवसेना पक्ष (Shiv Sena Party) कोणाचा आहे या मुद्द्यावर शिंदे गट (Shinde group) शिवसेना (Shiv Sena) आणि उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेत संघर्ष रंगला आहे.

The meeting of Smita Thackeray and the Chief Minister
स्मिता ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीने अनेकांना धक्का  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ठाकरे या आडनावाकडून शिवसेना पक्षच हिसकावून घेतला जात असल्याचा प्रयत्न केला जात असताना स्मिता ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी भेट
  • 1995-99 या काळात स्मिता ठाकरे एक शक्तीशाली व्यक्ती म्हणून ओळख निर्माण झाली होती.
  • स्मिता या बाळ ठाकरे यांचा मुलगा जयदेव ठाकरे यांच्या पत्नी आहेत.

Smita Thackeray meets Maharashtra CM Eknath Shinde: महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकीय पेचप्रसंगानंतर (political crisis)नवे सरकार (government) स्थापन झाले असले तरी सत्तासंघर्ष सुरूच आहे. आता पक्षप्रमुख (Party chief ) पद आणि शिवसेना पक्ष (Shiv Sena Party) कोणाचा आहे या मुद्द्यावर शिंदे गट (Shinde group) शिवसेना (Shiv Sena) आणि उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेत संघर्ष रंगला आहे. ठाकरे या आडनावाकडून शिवसेना पक्षच हिसकावून घेतला जात असल्याचा प्रयत्न केला जात असल्याची शंका खुद्द उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

याच दरम्यान ठाकरे कुटुंबातील एका सदस्याने  मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे. शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची सून स्मिता ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रत्येक गल्ली-कोपऱ्यात चर्चेला उधाण आले आहे. 

Read Also : पुण्यातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची ईडीकडून चौकशी

सदिच्छा भेट 

बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांना भेटणाऱ्या ठाकरे कुटुंबातील त्या पहिल्या व्यक्ती आहेत. शिवसेना संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची सून असलेल्या चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे यांनी मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि ते शिवसेनेचे जुने शिवसैनिक असल्याचे सांगितले. यासोबतच त्यांनी त्यांच्या भेटीचे वर्णन शिष्टाचार म्हणून केलेदक्षिण मुंबईतील 'सह्याद्री' या शासकीय अतिथीगृहात शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, एकनाथ शिंदे हे जुने शिवसैनिक आहेत ते मुख्यमंत्री झालेले आहेत. यासाठी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी येथे आले आहे. मी त्यांना आणि त्यांच्या कामाला अनेक वर्षांपासून ओळखते, ही एक सदिच्छा भेट होती. आम्ही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतो म्हणून आज मी त्यांना भेटले.

Read Also : 3-0 ने मालिका जिंकत भारताचा वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश

स्मिता या बाळ ठाकरे यांचा मुलगा जयदेव ठाकरे यांच्या पत्नी

शिवसेनेतील बंडखोरीबाबत स्मिता यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की,  मी समाजसेविका असून राजकारणात नसल्याने मला याबाबत काहीही माहिती नाही. स्मिता म्हणाल्या, "मी राजकारणात नाही, मला याबद्दल काहीही माहिती नाही." 1995-99 या काळात त्या शिवसेनेतील एक शक्तिशाली व्यक्ती होत्या.  स्मिता या बाळ ठाकरे यांचा मुलगा जयदेव ठाकरे यांच्या पत्नी आहेत. शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात 50 आमदारांसह केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकार गेल्या महिन्यात कोसळले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी