मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेसचा अंतर्गत कलहातून मोठी घटना घडली आहे. नाना पटोले यांच्या कार्यशैलीबद्दल नाराज असलेले बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा (resignation) दिला आहे. याविषयीची माहिती सुत्रांनी दिली आहे. नाशिक पदवीधर निवडणूक (Nashik Graduate Constituency Election) निकालाच्या दिवशी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती मिळत आहे. आता दिल्ली हायकमांड याबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Balasaheb Thorat's resignation from the post of Legislature Party Leader)
अधिक वाचा : सकाळी पोट साफ होत नाही,मग करा हे काम
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress state president)नाना पटोलेंच्या कामाविषयी नाराजी थोरात यांनी बोलून दाखवली होती. नाना पटोले यांच्या कार्यशैलीबद्दल व्यक्त केलेली नाराजी आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या (Nashik Graduate Constituency) निवडणुकीत (Election) दाखवलेली निष्क्रियता. तसेच पक्ष आणि तांबे कुटुंबात समन्वय घडवून आणण्यात आलेले अपयश यामुळे थोरात यांचे पद अडचणीत आले होते.
अधिक वाचा : शरीरातील चरबी जाळतील हे drinks
तर थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचे सांगितले होते. तसेच आपल्याला पक्षात अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची खंत देखील बोलून दाखवली होती. आपल्या वाढदिवसानिमित्त थोरात यांनी हॉस्पीटलमधून नागरिकांशी आणि आपल्या कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली होती.
अधिक वाचा : भरपूर पाणी पिण्याचे आहेत अनेक फायदे; दूर होतात अनेक आजार
नाशिक पदवीधराच्या निवडणुकीत आणि निवडणूकी आधी होत असलेल्या राजकारणाविषयी त्यांनी आपलं मत मांडलं होतं. याची माहिती त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात दिली आहे. सत्ताबदलानंतर संगमनेर तालुक्यावर राजकारण होताना दिसत आहे. अनेक कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय. संगमनेरमधील कार्यकर्त्यांचे उद्योग व्यवसाय बंद पाडण्यासाठी नाही ते प्रयत्न केले जात आहेत. विकासाचं सुरू असलेलं काम बंद पाडण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोपही त्यांनी ऑनलाइन संवाद साधताना केला होता.
अधिक वाचा : हिवाळ्यात कोरड्या केसांसाठी हे तेल आहेत बेस्ट
नाना पटोले यांच्या कार्यशैलीविषयी थोरात यांनी प्रश्न उपस्थित करत आपण प्रदेशाध्यक्षासोबत काम करू शकत नसल्याचं सांगितलं होतं. पुणे कसबा आणि चिंचवडमधील पोट निवडणूक झाल्यानंतर काँग्रेस पक्ष बाळासाहेब थोरात यांच्या पत्रावर उत्तर कारवाई करणार होते. त्याआधीच बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.