मुंबईः महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्व धार्मिकस्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी आवाज फाउंडेशन (Awaaz Foundation) या स्वयंसेवी संस्थेने केली आहे. वाढत्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आवाज फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने धार्मिकस्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केली आहे. आवाज फाउंडेशनच्या प्रमुख सुमायरा अब्दुल अली (Sumaira Abdulali) यांनी मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी धार्मिकस्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केली आहे. (ban loudspeakers on all religious places)
काही दिवसांपूर्वी आवाज फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने मुंबईच्या उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करुन ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा मांडला होता. या याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने धर्म म्हणजे ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे ठिकाण नाही, असे मतप्रदर्शन केले होते. ध्वनी प्रदूषण नियमावलीचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही याची तपासणी वेळोवेळी करणे आणि नियमाचे उल्लंघन झाल्यास कारवाई करणे ही जबाबदारी स्थानिगक पोलिसांची आहे. या पोलिसांवर राज्य सरकारचे थेट नियंत्रण असल्यामुळे ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. याआधीही सर्वोच्च न्यायालयाने तसेच मुंबईच्या उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदूषण या विषयावर मार्गदर्शन केले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आवश्यक ती कृती करणे अपेक्षित असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले.
अलिकडेच मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात आलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी आवाज फाउंडेशनने ट्विटरच्या माध्यमातून थेट संबंधित पोलिसांपर्यंत तसेच राज्य सरकारपर्यंत पोहोचविल्या आहेत. हे करुनही ध्वनी प्रदूषण सुरू आहे, त्यामुळे ध्वनी प्रदूषणाला आळा नियमानुसार घालण्यासाठी योग्य ते उपाय करावे, असे निर्देश मुंबईच्या उच्च न्यायालयाने दिले आहेत. हे दिशानिर्देश देण्यात आल्यानंतर आवाज फाउंडेशनच्या प्रमुख सुमायरा अब्दुल अली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले. पत्राद्वारे आवाज फाउंडेशनने महाराष्ट्रातील सर्व धार्मिकस्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केली.
आता तंत्रज्ञान उपलब्ध आहे. भजन, अजान, प्रवचन, प्रेयर (प्रार्थना) मोबाइलवर प्रत्येकाला बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. इंटरनेट, मोबाइल, टीव्ही, रेडिओ नेटवर्क असे अनेक तांत्रिक पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांचा प्रभावी वापर केल्यास कोणताही संदेश ताबडतोब आणि प्रभावीरित्या एकाचवेळी अनेकांना देणे शक्य आहे. त्यामुळे धार्मिक उद्देशांसाठी लाऊडस्पीकरची आवश्यकता उरलेली नाही. याच कारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आवाज फाउंडेशनने महाराष्ट्रातील सर्व धार्मिकस्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने धार्मिक कार्यक्रम शक्य आहेत. अशा परिस्थितीत धार्मिकस्थळांवरुन लाऊडस्पीकरचा वापर करुन ध्वनी प्रदूषण करणे टाळावे, अशी मागणीही आवाज फाउंडेशनने केली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.