मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना प्रतिबंध

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 25, 2022 | 20:40 IST

Ban on heavy vehicles on Mumbai-Goa National Highway : गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे.

Ban on heavy vehicles on Mumbai-Goa National Highway
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना प्रतिबंध  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना प्रतिबंध
  • प्रतिबंधात्मक आदेश शनिवार २७ ऑगस्ट २०२२ पासून शनिवार १० सप्टेंबर २०२२ पर्यंत
  • जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना प्रतिबंधात्मक आदेशातून वगळले आहे

Ban on heavy vehicles on Mumbai-Goa National Highway : गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. हा प्रतिबंधात्मक आदेश शनिवार २७ ऑगस्ट २०२२ (मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटांपासून) पासून शनिवार १० सप्टेंबर २०२२ रोजी रात्री आठ वाजेपर्यंत लागू आहे. 

मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर वाळू/रेती व तत्सम गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी आहे. दूध, पेट्रोल/डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना प्रतिबंधात्मक आदेशातून वगळले आहे. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे गणेश चतुर्थी निमित्ताने कोकणवासीयांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात येते.  राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वरुन जड वाहने व रेतीची वाहतूक करणारी वाहने यांच्या वाहतूकीमुळे या कालावधीत कोकणाकडे ये-जा करणा-या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून वाहनांची कोंडी होऊन प्रवाशांची गैरसोय होते, त्यामुळे गृह (परिवहन) विभागाने मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ११५ मधील तरतूदीचा वापर करुन  सार्वजनिक हितास्तव पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ (रा.म.क्र.जुना क्र.१७) (पनवेल ते सिंधुदूर्ग मार्गे पेण, वडखळ, नागोठाणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी) वरुन होणारी वाळू/रेती भरलेल्या ट्रकची, मोठ्या ट्रेलर्सच्या तसेच अवजड वाहनांच्या वाहतूकीस प्रतिबंध केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी