Mhada Lottery 2023, Mhada Flat Video Viral : म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्याआधी बघून घ्या कसे दिसते म्हाडाचे घर? व्हिडीओ व्हायरल

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Feb 13, 2023 | 16:00 IST

Before applying for MHADA lottery, see how MHADA house looks like? Video Viral : अनेक मध्यमवर्गीय आजही म्हाडा आणि सिडकोच्या लॉटरीवर लक्ष ठेवून आहेत. अशा लाखो नागरिकांसाठी एकाने म्हाडाच्या घराचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे.

see how MHADA house looks like
म्हाडाच्या फ्लॅटचा व्हिडीओ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्याआधी बघून घ्या कसे दिसते म्हाडाचे घर?
  • व्हिडीओ व्हायरल
  • व्हिडीओ s1nghvarun या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अपलोड करण्यात आला आहे

Before applying for MHADA lottery, see how MHADA house looks like? Video Viral : घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण म्हाडा (MHADA - Maharashtra Housing and Area Development Authority.) लॉटरीची वाट बघत असतात. मुंबईत मार्च 2023 मध्ये गोरेगाव येथील 2683 घरांसाठी म्हाडाची लॉटरी निघणार आहे. या व्यतिरिक्त कन्नमवार नगर, वांद्रे, बोरिवली, मागाठाणे येथे पण म्हाडाची घरे उपलब्ध होणार आहेत. म्हाडाकडून आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. 

गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर परिसरातल्या घरांसाठी म्हाडाने 2016 मध्ये लॉटरी काढली होती. पण कोरोना संकटामुळे या घरांचे काम लांबणीवर पडले होते. आता सिद्धार्थनगर परिसरातल्या 306 घरांचे बांधकाम म्हाडाने सुरू केले आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर या घरांचा ताबा दिला जाण्याची शक्यता आहे.

म्हाडा अथवा सिडकोच्या माध्यमातून घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात लाखो मध्यमवर्गीय आजही प्रयत्न करत आहेत. आपल्या बजेटमध्ये बसणारे, स्वप्न पूर्ण करणारे घर होईल या आशेवर अनेक मध्यमवर्गीय आजही म्हाडा आणि सिडकोच्या लॉटरीवर लक्ष ठेवून आहेत. अशा लाखो नागरिकांसाठी एकाने म्हाडाच्या घराचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. या व्हिडीओच्या निमित्ताने म्हाडाच्या नव्या घरांचे काम कसे असते याचा अंदाज येण्यास मदत होऊ शकते. यामुळे अनेकजण हा व्हिडीओ बघत आहेत, शेअर करत आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. इन्स्टाग्रामवरून व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

तुर्कस्तान आणि सीरियात भारताचे ऑपरेशन दोस्त

जगातील सर्वात सुंदर Railway Stations

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Varun Singh (@s1nghvarun)

व्हायरल होत असलेला व्हिडीओ म्हाडाने बांधलेल्या एका टू बीएचके फ्लॅटचा आहे. या घराची किंमत व्हिडीओ शेअर करणाऱ्याने 75 लाख रुपये एवढी सांगितली आहे. हा व्हिडीओ s1nghvarun या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अपलोड करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी