मुनगंटीवारांच्या आधी या काँग्रेस नेत्याने महाराजांची तलवार आणण्यासाठी केली होती धडपड, पण...

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 11, 2022 | 14:43 IST

ब्रिटनमध्ये असलेली महाराजांची तलवार महाराष्ट्रात आणण्यासाठी महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांनी खूप धडपड केली होती. मात्र, एका घटनेमुळं त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. नाहीतर आज जगदंबा तलवार भारतात असली, असं म्हटलं जातं. दरम्यान, आता शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री असलेले भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी परत एकदा जगदंब तलवार परत राज्यात आणण्याचा प्लान तयार केला आहे.

Congress leader tried to bring Maharaj's sword but, know more
काँग्रेस नेत्याने महाराजांची तलवार आणण्यासाठी केली होती धडपड  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • शिवप्रताप दिनानिमित्त महाराष्ट्राचे कॅबिनेटमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी ही घोषणा केली.
  • महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ए.आर अंतुले यांनी जगदंबा तलवार भारतात आणण्याची घोषणा सर्वप्रथम केली होती.
  • 1969 ते 1976 या काळात ए.आर अंतुले यांनी राज्यात मंत्रिपद भूषवलं होतं.

मुंबई :  छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जीवनाशी किंवा त्यांच्या वस्तू किंवा त्यांच्या जीवनावरील साधा चित्रपट येणार म्हटलं तरी राजकारणात (politics) मोठी चर्चा होत असते. सध्या महाराजांच्या जीवनावर आणि त्यांच्या मावळ्यांच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित होत आहेत, त्यावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. याच दरम्यान सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवाजी महाराज यांची जगदंब तलवार (Jagdamba sword) राज्यात परत आणणार असल्याची घोषणा केली आहे. जगदंबा तलवारीवरुन याआधीही भारताच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. याआधीही शिवरायांची तलवार भारताल पुन्हा द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. यावरुन श्रेयवादाची लढाई सुरू होण्याची शक्यता आहे. (Before Mungantiwar this Congress leader tried to bring Maharaj's sword but, know more..)

अधिक वाचा  : संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी

दरम्यान, शिवप्रताप दिनानिमित्त महाराष्ट्राचे कॅबिनेटमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी ही घोषणा केली. 2024 पर्यंत ही तलावर राज्यात आणणार असा दावा त्यांनी केलाय. परंतु वाचक मंडळींनो, सुधीर मनगुंटीवार यांच्या आधी एका काँग्रेस नेत्याने शिवरायांची तलवार राज्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. या काँग्रेस नेत्याचे नाव आहे, माजी मुख्यमंत्री आर. ए. अंतुले. काँग्रेस नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ए.आर अंतुले यांनी जगदंबा तलवार भारतात आणण्याची घोषणा सर्वप्रथम केली होती.

अधिक वाचा  : आम्ही स्वप्न पूर्ण नाही करू शकलो मात्र...विराटने लिहिले असे

ब्रिटनमध्ये असलेली महाराजांची तलवार महाराष्ट्रात आणण्यासाठी महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांनी खूप धडपड केली होती. मात्र, एका घटनेमुळं त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. नाहीतर आज जगदंबा तलवार भारतात असली, असं म्हटलं जातं. दरम्यान, आता शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री असलेले भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी परत एकदा जगदंब तलवार परत राज्यात आणण्याचा प्लान तयार केला आहे.शिवराज्याभिषेकाला 2024 मध्ये साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून एक आराखडा तयार करण्यात येत आहे. या सर्व कार्यक्रमात ब्रिटनकडून 'जगदंबा तलवार' मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.  

वाचकांनो अंतुले यांनी सर्वप्रथम शिवरायांची तलवार राज्यात आणण्याची घोषणा केली होती.1969  ते 1976  या काळात त्यांनी राज्यात मंत्रिपद भूषवलं होतं. तर, 9 जून 1980 रोजी अंतुलेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मुख्यमंत्रीपदावर विराजमान होताच अंतुलेंनी कामाचा धडाका लावला होता.मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी  लंडनच्या संग्रहालयात असणारी 'जगदंबा तलवार' परत आणण्याचा निर्णय घेतला होता. 

यामुळे भारतापासून दूर राहिली महाराजांची तलवार

जगदंबा तलवार परत आणण्यासाठी अंतुले यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात अनेक प्रयत्न केले होते. त्यांनी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्याशी बोलणीही सुरू केली होती, त्यांची बैठकही ठरली होती. पण या बैठकीच्या आधीच त्यांना राजीनामा द्यावा लागला. नंतर मात्र, मुख्यमंत्रीपदी असलेले बाबासाहेब भोसले हे राणीशी चर्चा करण्यासाठी गेलेचं नाही. त्यामुळं जगदंबा तलवार भारतात आलीच नाही. जर अंतुले आणि ब्रिटनच्या राणीची चर्चा घडली असती तर कदाचित आज तलवार महाराष्ट्रात परत आली असती.

अधिक वाचा  :  द्रविड गुरूने सांगितलं भारतीय संघाच्या पराभवाचं खरं कारण

भ्रष्टाचारामुळे द्यावा लागला राजीनामा 

सिमेंट घोटाळ्यामुळे माजी मुख्यमंत्री अंतुलें यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आणीबाणीनंतर देशात परत निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसने विजय मिळवला होता. इंदिरा गांधींनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी अब्दुल रहेमान अंतुले यांच्या खांद्यावर सोपवली होती. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक धडाडीचे कामे केली होती. याचकाळात त्यांनी काही ट्रस्टची स्थापना केली होती. या ट्रस्टचं काम निधी गोळा करणं होतं. त्यापैकीच एक ट्रस्ट होतं ‘इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान’अंतुलेंनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्या ट्रस्टसाठी मोठ्या प्रमाणात निधी जमवल्याचा ठपका एका पत्रकाराने ठेवला होता.‘इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान’साठी अनेक कंत्राटदारांकडून निधी गोळा करण्यात आला होता. त्या बदल्यात त्यांना मोठ्या प्रमाणात सिमेंटचा पुरवठा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करू देण्यात आला होता.  यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. 

ब्रिटनमध्ये असलेली तलवार भवानी का जगदंब कोणती 

आर.ए. अंतुले यांनी त्याकाळी 'भवानी तलवार' भारतात परत आणण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात भवानी तलवार ही महाराष्ट्रातील सातारा छत्रपतींकडे आहे. तर, लंडनच्या संग्रहालयात असलेली तलवार ही 'जगदंबा तलवार' आहे. अंतुलेंनी केलेल्या घोषणेमुळं कित्येत वर्ष भवानी तलवार लंडनमध्ये असल्याचा गैरसमज झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी