bellasis bridge, ray road bridge, tilak bridge, byculla bridge, arthur road bridge, curry road bridge and matunga bridge this old bridges in Mumbai will be broken : कोरोना संकटामुळे जनगणना अद्याप झालेली नाही. पण एका अंदाजानुसार मुंबईची लोकसंख्या 2023च्या अखेरपर्यंत 2 कोटींचा टप्पा ओलांडेल. या वाढत्या लोकसंख्येच्या गरजांचा विचार करून मुंबईत मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याचे काम सुरू आहे.
दक्षिण मुंबईत इंग्रजांच्या काळात बांधण्यात आलेले अनेक जुने पूल तोडण्याची तयारी सुरू आहे. विकास योजना राबवताना महामुंबई अर्थात मुंबई महानगर क्षेत्राचा (Mumbai Metropolitan Area) विचार केला जात आहे.
मुंबई महानगर क्षेत्राची एकूण लोकसंख्या 2011 मध्ये 2.36 कोटी होती. ही लोकसंख्या किती वेगाने वाढेल याचा विचार करून तसेच या लोकसंख्येच्या गरजांचे प्राधान्यक्रम ठरवून विकास योजना राबवण्याचे काम सुरू आहे. रेल्वे आणि रस्त्यांचे विस्तृत जाळे निर्माण केले जात आहे. मेट्रोचे नेटवर्क विकसित करून प्रवास गतिमान करण्याचे काम सुरू आहे. रस्त्यांवरून होणारा प्रवास वेगवान करण्यासाठी उड्डाणपूल, भुयारी मार्ग (बोगदा / टनेल) आणि महामार्गांचे मोठे जाळे निर्माण केले जात आहे. या विस्तृत विकास योजनेचा भाग म्हणून जुने तसेच धोकादायक स्थितीतले पूल तोडून नव्या विकास योजना राबवल्या जात आहेत.
बेलासिस ब्रिज, रे रोड ब्रिज, दादरचा टिळक ब्रिज, भायखळ्याचा एस ब्रिज, आर्थर रोड ब्रिज, करी रोड ब्रिज आणि माटुंगा ब्रिज हे सर्व पूल पाडले जाणार आहेत. नव्या पुलांची निर्मिती करण्याआधी हे इंग्रजांच्या काळातील जुने पूल पाडले जातील. काही ठिकाणी एका बाजूने नव्या पुलाची निर्मिती सुरू आहे आणि पुढील टप्प्याचे काम करणे सोयीचे व्हावे यासाठी जुने पूल पाडण्याचे काम सुरू आहे. हे पूल पाडण्यासाठी महारेल आवश्यक ते नियोजन करत आहे.
बेलासिस ब्रिजवरील वाहतूक बंद करण्यासाठी रेल्वेने वाहतूक पोलिसांना 14 मार्च 2023 रोजी एक पत्र पाठवले आहे. पुढील नियोजन सुरू आहे.
बेलासिस ब्रिज (1893)
लांबी : 380 मीटर
कामाचा कालावधी : 650 दिवस
अंदाजे खर्च : 140 कोटी रुपये
मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड दरम्यान असलेला बेलासिस ब्रिज 130 वर्षे जुना आहे. इंग्रज मेजर जनरल जे. बेलासिस यांच्यावरून पुलाला बेलासिस ब्रिज हे नाव देण्यात आले. हा पूल तोडून नवा पूल बांधण्यात येईल. नव्या पुलाचा रेल्वेच्या हद्दीतील भाग रेल्वे तर उर्वरित पुलाचे काम मुंबई महापालिका करणार आहे.
टिळक ब्रिज (1925)
लांबी : 663 मीटर
कामाचा कालावधी : 640 दिवस
अंदाजे खर्च : 375 कोटी रुपये
भायखळा ब्रिज (1922)
लांबी : 650 मीटर
कामाचा कालावधी : 350 दिवस
अंदाजे खर्च : 200 कोटी रुपये
रे रोड ब्रिज (1920)
लांबी : 220 मीटर
कामाचा कालावधी : 2 वर्ष
अंदाजे खर्च : 145 कोटी रुपये
हे उपाय करा आणि Heart Attack चा धोका नैसर्गिकरित्या कमी करा
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.