Mumbai Metro Route : मेट्रोच्या 3 रूटच्या कनेक्टिव्हिटीचा होणार फायदा, दहिसरवरून थेट वर्सोवा आणि घाटकोपरपर्यंत जाता येणार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 17, 2023 | 08:06 IST

Benefiting from the connectivity of 3 metro lines, direct access from Dahisar to Versova and Ghatkopar : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मेट्रोच्या 3 रूटच्या (Metro Route) कनेक्टिव्हिटीचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

Benefiting from the connectivity of 3 metro lines
मेट्रोच्या 3 रूटच्या कनेक्टिव्हिटीचा होणार फायदा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मेट्रोच्या 3 रूटच्या कनेक्टिव्हिटीचा होणार फायदा
  • मेट्रोने दहिसरवरून थेट वर्सोवा आणि घाटकोपरपर्यंत जाता येणार
  • मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 गुरुवार 19 जानेवारी 2023 पासून पूर्णपणे कार्यरत होणार

Benefiting from the connectivity of 3 metro lines, direct access from Dahisar to Versova and Ghatkopar : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मेट्रोच्या 3 रूटच्या (Metro Route) कनेक्टिव्हिटीचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. मेट्रोमुळे नागरिकांना दहिसरवरून थेट वर्सोवा आणि घाटकोपरपर्यंत तसेच वर्सोवा आणि घाटकोपर येथून थेट दहिसरपर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे.

मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 गुरुवार 19 जानेवारी 2023 पासून पूर्णपणे कार्यरत होत आहेत. यामुळे मेट्रोचे 3 रूट एकमेकांशी जोडले जातील. मुंबईच्या पश्चिम आणि उत्तर उपनगरांना 2 मेट्रो रूटद्वारे जोडणाऱ्या मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 चा पहिला टप्पा (First Phase) एप्रिल 2022 मध्ये सुरू झाला. आता हा संपूर्ण रूट सुरू सुरू होत आहे. यामुळे मेट्रोच्या आरे स्टेशनपासून डहाणूकरवाडीपर्यंत (कांदिवली पश्चिम) हा एक सलग रूट होणार आहे. कमानीच्या स्वरूपातील 35 किलोमीटर अंतराचा हा रूट आहे. या रूटमुळे नागरिकांना मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या पूर्वेकडे गुंदवली ते पश्चिमेकडील अंधेरी पश्चिम अर्थात डी. एन. नगरपर्यंत मेट्रोद्वारे प्रवास करणे शक्य होणार आहे.

मेट्रो 2 ए हा रूट आनंदनगर (दहिसर पूर्व / दहिसर ईस्ट) ते डी. एन. नगर असा आहे. तर मेट्रो 7 हा रूट दहिसर पूर्व (दहिसर ईस्ट) ते गुंदवली असा आहे. याआधी एप्रिल 2022 मध्ये मेट्रो 2 ए चा आनंदनगर ते डहाणूकरवाडी आणि मेट्रो 7 चा दहिसर पूर्व ते आरे असा रूट सुरू झाला होता. 

मेट्रो 2 ए रूटची एकूण लांबी 18.60 किमी तर मेट्रो 7 ची एकूण लांबी 16.50 किमी आहे. आता दहिसर ते अंधेरी दरम्यान पूर्वेला आणि पश्चिमेला जायचे असल्यास रस्त्यावरील वाहतूक टाळून मेट्रोने जाता येणार आहे. 

वर्सोवा ते घाटकोपर मार्गावर मेट्रो 1 आधीपासूनच सुरू आहे. नव्या 2 मेट्रो रूटमुळे गुंदवली येथून जवळच असलेले मेट्रो 1 चे वेह अर्थात वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (पश्चिम द्रुतगती महामार्ग) तसेच डी. एन. नगर येथून मेट्रोच्या वेगवेगळ्या मार्गांवर ये-जा करणे शक्य होणार आहे.

मुंबई ते रायगड अवघ्या 20 मिनिटांत गाठता येणार, वाचा कसा आहे देशातील सर्वात लांबीचा सागरी मार्ग असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प

Sea Links to ease Mumbai roads : नरिमन पॉइंट ते विरार एका तासात, 5 सी लिंकमुळे प्रवास होणार सुपरफास्ट

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी