BEST BUS, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते खारघर बेस्टची एसी बससेवा

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 14, 2022 | 18:52 IST

BEST AC BUS For Mumbai International Airport To Kharghar : बेस्ट उपक्रमाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते खारघर अशी एसी बससेवा सुरू केली आहे. ही बस टी टू अर्थात टर्मिनल टू येथून खारघरपर्यंत अवघ्या ५० मिनिटांत पोहोचणार आहे. 

BEST AC BUS For Mumbai International Airport To Kharghar
BEST BUS, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते खारघर बेस्टची एसी बससेवा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • BEST BUS, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते खारघर बेस्टची एसी बससेवा
  • बस टी टू अर्थात टर्मिनल टू येथून खारघरपर्यंत अवघ्या ५० मिनिटांत पोहोचणार
  • मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते खारघर एसी बसचे तिकीट २५० रुपयांत उपलब्ध

BEST AC BUS For Mumbai International Airport To Kharghar : बेस्ट उपक्रमाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते खारघर अशी एसी बससेवा सुरू केली आहे. ही बस टी टू अर्थात टर्मिनल टू येथून खारघरपर्यंत अवघ्या ५० मिनिटांत पोहोचणार आहे. । बेस्ट बस

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, पाम बीच मार्ग, एन. आय. आर. कॉम्प्लेक्स सीवूड, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, कोकण भवन, सीबीडी बेलापूर, जलवायू विहार, खारघर अशी ही बससेवा ५० मिनिटांत प्रवास पूर्ण करून गंतव्य स्थानापर्यंत अर्थात डेस्टिनेशन पर्यंत पोहोचणार आहे. 

बेस्ट चलो मोबाईल अॅप, बेस्ट चलो बसकार्ड, एन.सी.एम.सी. या कार्डांचा उपयोग करून तिकीट खरेदी करण्याचे पर्याय या बससाठी उपलब्ध आहेत. 

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते खारघर एसी बसचे तिकीट २५० रुपयांत उपलब्ध आहे. वाशीपर्यंत जाण्यासाठी १५० रुपये आणि सीवूडपर्यंत जाण्यासाठी १७५ रुपयांचे तिकीट उपलब्ध आहे. सीबीडी बेलापूरसाठी २२५ रुपयांचे तिकी उपलब्ध आहे.

बेस्टने ५० मिनिटांची मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते खारघर एसी बस सुरू करण्याव्यतिरिक्त सीएसएमटी ते चर्चगेट-बॉम्बे हॉस्पिटल अशी पण एक बससेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. हा दक्षिण मुंबईतील एक नवा रिंगरूट असेल.

मुंबई महानगर प्रदेशात बेस्टची बससेवा ही सर्वाधिक लोकप्रिय बससेवांपैकी एक आहे. यामुळेच प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून बेस्ट वेळोवेळी नव्या बससेवा सुरू करणे, अस्तित्वात असलेल्या सेवांमध्ये प्रवाशांच्या आग्रही मागण्यांचा विचार करून व्यावहारिक पातळीवर योग्य ठरतील असे बदल करणे हे प्रयोग करते. चांगला प्रतिसाद मिळत असेल तरच बससेवा दीर्घ काळ सुरू ठेवली जाते. नाही तर बस सेवा बंद केली जाते अथवा टप्प्याटप्प्याने फेऱ्या कमी केल्या जातात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी